Home Nagpur #Nagpur । आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई

#Nagpur । आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई

399

नागपूर ब्युरो : नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे आशीनगर झोनमधील ८ थकबाकीदारांवर सोमवारी (ता.२८) कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये आठही थकबाकीदारांकडील साहित्य जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) श्री. मिलींद मेश्राम यांच्या आदेशान्वये आशीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. हरीश राउत यांच्या नेतृत्वातील पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

श्रीमती कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु, (जगत सेलीब्रेशन हॉल, पावरग्रीड चौक, नागपूर), श्री. देवेन्द्र नामदेवराव पवार (पवार सावजी भोलनालय, पाटणकर चौक, नागपूर.), श्री. भिषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी, श्री. प्रितमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. १२९, १२९ / अ (गुज्जर लॉन, पाटणकर चौक, नागपूर), श्रीमती प्रतिभा अश्विन शंभरकर व इतर अशी मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे आहेत.

श्रीमती कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु (जगत सेलीब्रेशन हॉल, पावरग्रीड चौक, नागपूर.) यांच्यावर रू. ९,८८,२२०/- मालमत्ताकर थकीत होता. सदर थकीत मालमत्ता कराचा भरणा मौक्यावर न केल्याने त्यांची अचल मालमत्तासह मौक्यावर असलेले सर्व टेबल खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

श्री. देवेन्द्र नामदेवराव पवार (पवार सावजी भोलनालय, पाटणकर चौक, नागपूर.) यांच्यावर रू. १,१७,४८६ /- मालमत्ताकर थकीत होता. सदर थकीत मालमत्ता कराचा भरणा मौक्यावर न केल्याने त्यांची अचल मालमत्तासह मौक्यावर असलेले सर्व टेबल खुर्ची व इतर साहित्य जसे भोजनालय मधील वापरित असलेले २ मोठे फ्रीज, १७ खुर्ची, ४ टेबल व टी.व्ही. जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

श्री. भिषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी यांच्यावर थकीत मालमत्ताकरापोटी रू. १,५०,५६३/- थकीत असुन दर्ज मालमत्ताधारक यांनी मौक्यावर कराचा भरणा न केल्याने त्यांचे १५०० चौ.फु. चे खुले भुखंड व त्यावर कच्चे स्वरूपाचे बांधलेले १०० चौ.फु. चे १ रूम व त्या रूममध्ये असलेले २ खुर्च्या, १ टी. व्ही. व १ मोटर सायकल जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

श्री. प्रितमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. १२९, १२९ / अ (गुज्जर लॉन, पाटणकर चौक, नागपूर) यांच्यावा रू. ७,८८, ५६८/-, रु. २,४५, ५६०/- असे २ लॉन मिळुन एकुण रू. १०,३४,१२८/- मालमत्ताकर थकीत होता. व सदर्ह थकीत मालमत्ता कराचा भरणा मौक्यावर न केल्याने त्यांची अचल मालमत्तासह मौक्यावर असलेले सर्व टेबल खुर्ची व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले असुन सुपुर्दनाम्यावर दर्ज मालमत्ताधारक यांना सुपुर्द करण्यात आले.

श्रीमती प्रतिभा अश्विन शंभरकर व इतर यांच्या मालकीचे घराचे एकुण रू. ६,३६,५२१ /- मालमत्ताकर थकीत असल्याने संबंधीत घरमालक यांनी प्रत्येक वेळेस थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. परंतु मौक्यावर कोणतेही अचल मालमत्ता उपलब्ध नसल्याने जप्त करण्यात आलेली नाही. केवळ त्यांचे राहते घर (स्थावर मालमत्ता) जप्त करण्यात आली.

या कारवाईमध्ये प्रमुख श्री. अनिल कऱ्हाडे (सहाय्यक अधिक्षक), श्री. सचिन मेश्राम, कर निरीक्षक, श्री. मनोज नाईकवाडे, कर निरीक्षक श्री. कवडु बहादुरे, कर निरीक्षक व या वार्डाचे कर संग्राहक श्री. शशिभूषण वालदे व श्री. प्रदीप तुंबडे यांनी सहकार्य केली.

Previous article#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद
Next article#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).