Home Maharashtra Maharashtra । शरद पवारांच्या ‘त्या’ आपुलकीने दुर्गम भागातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्याचे मन...

Maharashtra । शरद पवारांच्या ‘त्या’ आपुलकीने दुर्गम भागातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्याचे मन जिंकले

598

मुंबई ब्युरो : महाराष्ट्रातील काही प्रमुख राजकारण्यांबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की बोटावर मोजण्याइतके राजकारणी किंवा नेते मिळतील ज्यांना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची ओळख असते आणि ते त्यांच्या सुखदुःखात आपलेपणाने विचारपूस करतात. अशा नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार शीर्षस्थानी आहेत. हे पुन्हा एकदा त्यांच्या वर्तनातून सिद्ध झाले.

गडचिरोली सारख्या राज्याच्या दुर्गम भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महिला पदाधिकारी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन शरद पवारांना भेटायला गेली. शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त घाईत निघाले होते. मात्र त्यांनी सदर महिला पदाधिकाऱ्याला बघताच आपली गाडी थांबवली आणि येण्याचे कारण विचारले. त्यानंतर त्या महिला पदाधिकाऱ्यांशी तिच्या डॉक्टर मुलीच्या लग्नाबद्दल बातचीत केली आणि त्यांनी ज्या आत्मीयतेने विचारपूस केली त्यामुळे शरद पवारांचे मोठेपण पुन्हा एकदा दिसून आले.

या महिला पदाधिकारी आहेत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम. त्या शरद पवारांच्या या वर्तनाने इतक्या भारावून गेल्या की त्यांनी सोशल मीडियामध्ये तशी पोस्ट सुद्धा अपलोड केली जी सध्या वायरल होत आहे. “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” वर त्यांच्याच शब्दात त्यांच्या भावना आम्ही प्रकाशित करीत आहोत.

“मी माझ्या कन्येच्या विवाहाच्या निमंत्रण पत्रिका घेऊन साहेबांना आमंत्रण देण्याकरिता मुबई येथे साहेबांच्या निवसस्थानी सिल्वर ओक ला गेली होती. परंतु साहेबांना काही आवश्यक कामा निमित्त बाहेर जायचे होते असे समजल्यावर परती साठी निघाले होते. इतक्यात साहेबांचा ताफा निवास स्थानाच्या मुख्य गेट मधून बाहेर निघताच मी नमस्कार करण्यासाठी थांबले. त्यावेळी साहेबांसोबत संसदरत्न खा.सौ.सुप्रियाताई सुद्धा होत्या.

त्यांची नजर माझ्यावर पडताच त्यांनी त्यांचा ताफा अगदी थोड्या दूर जाऊन थांबविला व मला बोलाविले. मी, माझी कन्या आणि माझे सहकारी त्यांच्या जवळ पोहचताच साहेबांनी खूप आपुलकीने येण्याचे कारण विचारलें. जेंव्हा मी त्यांना सांगितले कि माझ्या कन्येच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी मी आले आहे तर त्यांनी माझ्या मुलीला यावेळी भरभरून शब्दरूपात आशीर्वाद दिले आणि विवाहाबद्दल खूप खूप शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्यानंतर माझ्या मुलीला आपुलकीने शिक्षणा बद्दल विचारले. त्याचक्षणी सौ. सुप्रिया ताईनी आम्हाला जवळ बोलाऊन साहेबांसोबत फोटो सुद्धा काढले. यावेळी ताईंनी सुद्धा आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.