नागपूर ब्युरो : महाराष्ट्र धनगर समाज महासंघ नागपूर विभाग पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक शनिवारला दुपारी गुरूदेव सेवा आश्रम गणेशपेठ नागपूर येथे विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे यांचे अध्यक्षतेखाली महासंघाचे प्रदेश चिटणीस युवराज घोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत महाराष्ट्र धनगर समाज महासंघ चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस युवराज घोडे यांनी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील संघटनात्मक कामाचा आढावा घेऊन दि ५-६ नोव्हेंबर ला २ दिवस प्रदेश पदाधिकारी यांचे दौऱ्याचे नियोजन करून जिल्हास्तरीय मेळावे तयारीचा आढावा घेतला.
बैठकीला मागदर्शन करतांना महासंघाचे प्रदेश चिटणीस युवराज घोडे म्हणाले कि महासंघाचे घटनेनुसार दर दोन वर्षांनी नविन कार्यकारिणी तयार होते जिल्हास्तरीय मेळाव्यात निवड झालेल्या नविन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येईल. सर्व जिल्ह्यांत भरगच्च मेळावे होण्यासाठी सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी गावस्तरावर बैठका घेऊन धनगर समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करावे असे ते म्हणाले.
सदर बैठकीला जि.प. नागपूर चे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे, विभाग सरचिटणीस अँड . गुणवंत सरोदे, वासुदेव आस्कर, जानराव घटारे, जिल्हा अध्यक्ष प्रा बाबाभाऊ टेकाडे, मल्हार सेना विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम थोटे, योगिराज उगे, सेवकराम डोकरे, चंद्रशेखर घोडे, प्रा जयंत डहाके, तेजराम मोरे, नत्थुजी ढवळे, राजेंद्र चांभारे, दिनकर गहाणे, सचिन चिडे यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.