Home Nagpur #Nagpur l गुंतवणूकदारांसाठी ‘वन स्टॉप डेस्टिनेशन’ ठरतोय क्रेडाई एक्स्पो, सोमवार शेवटचा दिवस

#Nagpur l गुंतवणूकदारांसाठी ‘वन स्टॉप डेस्टिनेशन’ ठरतोय क्रेडाई एक्स्पो, सोमवार शेवटचा दिवस

331
नागपूरः प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूकीसाठी नागरिकांच्या विश्वासाचे ठिकाण असलेल्या क्रेडाई नागपूर मेट्रो नागपूरच नव्हे तर विदर्भातील मालमत्ता गुंतवणूकदारांसाठी  ‘वन स्टॉप डेस्टिनेशन’ ठरत आहे. सात ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या एक्स्पोला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून सोमवार, १० ऑक्टोबर पर्यंत एक्स्पो चालणार आहे. सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटर येथे सकाळी 11 ते रात्री 9 दरम्यान नागरिकांना येथे भेट देता येईल.  याठिकाणी नागरिकांसाठी फ्लॉट, फ्लॅट, व्हिला, फार्महाऊस, दुकान, मॉल आधींचे सुमारे 200 पेक्षा जास्त प्रशासनाचे मान्यता प्राप्त प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. प्रकल्पाचे मुख्य स्पॉन्सर म्हणून एचडीएफसी, केसर लॅन्ड्स आणि केरोव्हीट लाभले आहे.
एक्स्पोच्या पहिल्या दिवसापासून नागपूरच नव्हे तर विदर्भातील गुंतवणूकदार एक्स्पोला भेट देत असून विविध मान्यताप्राप्त प्रकल्पातील माहिती जाणून घेत आहेत. या प्रदर्शनीमध्ये सुरुवातीच्या 14 लाख रुपयांपासून तर पुढे स्वतंत्र रो हाऊस, घर, आदींचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या एक्स्पोमध्ये असलेल्या सर्व प्रॉपर्टी ह्या महारेरा आणि एनएमआरटीएच्या मान्यता प्राप्त असल्याने ग्राहकांनाही शहरातील सर्व विश्वासू बिल्डर्सचे प्रकल्प एकाच ठिकाणी बघण्यास मिळत आहे. या एक्स्पोमध्ये शहराच्या मध्यभागापासून तर दाभा, मिहान, भंडारा रोड, चंद्रपूर रोड, वर्धा रोड, अमरावती रोड, उमरेड रोड, मनिषनगर, बेसा आदी ठिकाणच्या सर्व मान्यता प्राप्त प्रकल्पांची माहिती जाणून घेत आहेत. या प्रदर्शनीमध्ये सुरुवातीच्या 14 लाख रुपयांपासून तर पुढे स्वतंत्र रो हाऊस, घर, आदींचे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत.
स्पॉट बुकिंगवर विशेष सवलत
रविवारी शेखर कन्स्ट्रक्शनच्या कोराडी येथील शिव स्पार्क रेसिडेन्सी या प्रकल्पात ३ बीएचके फ्लॅटची बुकिंग मिश्रा कुटुंबाने केली. यासोबतच अनुराग डेव्हलपर्सच्या अनुराग ऑरकिड, जयताळा येथील प्रकल्पात श्याम गुप्ता यांनी ३ बीएचके फ्लॅटची स्पॉट बुकिंग केली.  मालमत्ता खरेदी, किंवा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक विश्वासाने स्थान बनले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी एक्स्पोमधील प्रकल्पांना राष्ट्रीयकृत बँकांची आधीच मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे कर्ज घेण्यासाठीही नागरिकांना बँकांमध्ये चकरा मारण्याची गरज पडणार नाही.क्रेडाई एक्स्पोमध्ये सहभागी विकासकांच्या विविध प्रकल्पांवर स्पॉट बुकिंगवर ५० हजार रुपयांपर्यंतही विशेष सवलत देण्यात येत आहे.
प्रकल्पांना बँकांची मंजूरी
क्रेडाईतर्फे आयोजित या एक्स्पोचा यंदा 12 वा सिझन असून मालमत्ता खरेदी, किंवा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक विश्वासाने स्थान बनले आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी एक्स्पोमधील प्रकल्पांना राष्ट्रीयकृत बँकांची आधीच मान्यता प्राप्त आहे. त्यामुळे कर्ज घेण्यासाठीही नागरिकांना बँकांमध्ये चकरा मारण्याची गरज पडणार नाही.
Previous articleInterview | पुन्हा भाजपने मला संधी दिली तर समाजकार्यासाठी त्या संधीचे सोने करेन
Next article#Nagpur | करणी सेना और अखिल भारतीय क्षत्रिय महासभा द्वारा दशहरा मिलन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).