Home Maharashtra Interview | पुन्हा भाजपने मला संधी दिली तर समाजकार्यासाठी त्या संधीचे सोने...

Interview | पुन्हा भाजपने मला संधी दिली तर समाजकार्यासाठी त्या संधीचे सोने करेन

480

– कळमेश्वर-ब्राह्मणी नगर पालिकेच्या माजी नगरसेविका प्रगती संजय मंडल यांच्याशी विशेष बातचीत

कळमेश्वर-ब्राह्मणी नगर पालिकेच्या माजी नगरसेविका प्रगती संजय मंडल

नागपूर ब्यूरो : महिलावर्गाने स्वतःला कुठेही असुरक्षित न समजता तसेच कुठलीही मनात भीती न बाळगता बिनधास्तपणे प्रत्येक क्षेत्रात आपला वावर वाढवावा. चूल, मूल व केवळ प्रपंचात न अडकता आज शासनाच्या वतीने महिलांसाठी नवनवीन योजना असून महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध स्वयंम रोजगारांच्या संधी उपलब्ध आहे, त्यांचा पूरेपूर लाभ घ्यावा. शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात आरक्षण असून शिक्षणात कुणीही मागे पडता कामा नये. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सुद्धा महिलांना ५० टक्के आरक्षण असून राजकीय क्षेत्र सुद्धा त्यांनी आपल्या कतृत्वाने गाजवावे, असे म्हणणे आहे कळमेश्वर-ब्राह्मणी नगर पालिकेच्या माजी नगरसेविका प्रगती संजय मंडल यांचे. ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’शी त्या बोलत होत्या.

‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’शी बोलतांना प्रगती संजय मंडल म्हणाल्या, ‘मी एक उत्तर भारतीय महिला असून २०१७ ला पालिकेच्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे येथील स्थानीय विविध जातीपातीच्या राजकारणाला तडा देऊन मी विजय प्राप्त केला. स्वतःला मी कधीच एक उत्तर भारतीय महिला म्हणून समजले नाही. मला पालिका निवडणुकीत विविध जाती धर्माच्या नागरिकांनी मदतीचा हात दिला. त्यांनी मला भरभरून मतदान केले.

गेल्या २५ वर्षापासून मी कळमेश्वरला वास्तव्यास असून सामाजिक कार्यात प्रचंड रस असल्या कारणाने माझी समाजसेवा मी सुरू केली. याची दखल घेत भाजप श्रेष्टींनी मला संधी दिली व त्या संधीचे मी सोने केले. भविष्यात पुन्हा भाजपने मला संधी दिली तर समाजकार्यासाठी त्या संधीचे मी सोने नक्कीच करेन. पहिल्यांदाच पालिकेच्या इतिहासात नगरसेविका म्हणून स्थान प्राप्त केले असल्याचे प्रगती संजय मंडल यावेळी म्हणाल्या.

उत्तर भारतीय सेलची महिला अध्यक्ष

विविध बचतगटाशी मी संलग्नित असून उत्तर भारतीय सेलची मी महिला अध्यक्ष आहे. गेल्या 8 ते 9 वर्षापासून उत्तर भारतीय संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून छटपुजासारखे कार्यक्रम मी इथे थाटात
साजरे करते.

उद्योग उभारून देत आहेत रोजगार

प्रगती संजय मंडल पुढे म्हणाल्या, स्त्री ही आतापर्यंत आपल्या कौटुंबिक भूमिका चांगल्याप्रकारे पार पाडीत आली आहे. मी सुद्धा आपल्यासारख्या चारचौघीसारखे होते. मनात प्रचंड दहशत परंतू समाजसेवेचे व्रत घेऊन घराबाहेर पडले. मागील ५ वर्षात कळमेश्वर-ब्राह्मणी पालिकेत नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले. गेल्या ६ महिन्यांपूर्वी कळमेश्वर औद्योगिक परिसरात एक मॅन्यूफॅक्चरींग ऑफ बायोमास ब्रिकव्हेंट नावाचा कारखाना टाकून परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्या म्हणतात की आयुष्यात कुठलीही गोष्ट अशक्य नसून शक्य करण्यासाठी आपली पाऊले धाडसाने पुढे पडली पाहिजे. त्याकरिता प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेलच हे मात्र खरं.

या विकासकामांचा लावला धडाका

माझ्या नगरसेविका पदाच्या कार्यकाळात मी आपल्या प्रभागात अनेक विकास कामाचा धडाका लावला. यामध्ये कळंबी बोअरवेल ते वसाहत, पाणी टाकीपर्यंत पाइपलाईनचे काम वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पूर्णत्वास नेले. त्यासाठी ५८ लाख ५२ हजार ६२० चा निधी वापरण्यात आला. नगररुत्थान योजनेअंतर्गत थोराने लेआऊट येथे ओपन स्पेस’ तसेच होरे लेआऊटमधील खुल्या जागेचे सौंदीकरणाकरिता ४ लाख ३१ हजार ४९५ चा निधी वापरण्यात आला.

सर्वसाधारण रस्ता अनुदानाअंतर्गत डोंगरे लेआऊटमधील बी.टी.रस्त्याचे बांधकाम ११ लाख २० हजार ९६७ रु निधी, नगररुत्थान योजने अंतर्गत होरे लेआऊटमधील खुल्या जागेचे सौंदीकरण ९ लाख ५५ हजार ७०१ सर्वसाधारण रस्ता अनुदानाअंतर्गत डोंगरे लेआऊटमधील डब्लूबीएम व आरसीसी पाइप ड्रेनेजचे काम निधी ५२ लाख ६५ हजार , विशेष रस्ता अनुदाना अंतर्गत म्हाडा कॉलनी मधील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण व फुटपाथ बांधकाम निधी ४६ लाख ७० हजार५००, विशेष रस्ता योजनेअंतर्गत गोंडखैरी रोड ते कस्तुरी अपार्टमेंट पर्यंत रस्ता १८ लाख ,विशेष रस्ता योजनेअंतर्गत होमगार्ड लेआऊट ते पाठक यांच्या घरापासून चा रस्ता व नाली बांधकाम १० लाख, प्रभागातील मचाने पाण्याची पाईप लाईन नप निधीतून ५० हजार ८०० खर्चुन पूर्णत्वास नेली.

उत्तर भारतीय बाधवांकरिता माझ्या स्वनिधीतून ५ लाख खर्चुन छटपूजा घाट निर्माण केला. पक्षाने माझ्या गेल्या ५ वर्षांच्या कार्याची दखल घेऊन आदेश दिल्यास निश्चितच रिंगणात असणार. खरोखरच माझ्या प्रभागातील कळमेश्वर-गोंडखैरी मार्गावरील रेल्वे उड्डाण पूल गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने समोरील अधोगीत परिसरातील विकास थांबला याकरिता पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरीना पक्षाचे वतीने ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर त्यांनी लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Previous articleराष्ट्रपति से लेकर पीएम तक, इन नेताओं ने दी वाल्मीकि जयंती और मिलाद उन नबी की शुभकामनाएं
Next article#Nagpur l गुंतवणूकदारांसाठी ‘वन स्टॉप डेस्टिनेशन’ ठरतोय क्रेडाई एक्स्पो, सोमवार शेवटचा दिवस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).