Home मराठी Maharashtra । निवडणूक आयोगाच्याविरोधात शिवसेना उचलणार मोठे पाऊल!

Maharashtra । निवडणूक आयोगाच्याविरोधात शिवसेना उचलणार मोठे पाऊल!

329
दिल्ली ब्युरो : अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला नाव तर वापरता येणार आहे, पण त्यातही बदल करावे लागणार आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसंच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव कॅम्प सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. कायदेशीर तज्ञांसोबत चर्चा होत आहे, आव्हानाची व्याप्ती याबद्दल विचार केला जात आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, आता न्यायालयीन हस्तक्षेपाची व्याप्ती कमी आहे, तथापि, आदेशाला आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Previous articleMaharashtra । शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा?
Next articleNagpur । स्व. राजीव गांधी की प्रतिमा के अनावरण के लिए शरद पवार को निमंत्रण
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).