Home Maharashtra Maharashtra । शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा?

Maharashtra । शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा?

392
मुंबई ब्युरो : अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाकडून नव्याने चिन्हाचा शोध सुरू आहे. शिवसेना सध्या 3 चिन्हावर विचार करत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसंच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. पण पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आता बदलावे लागणार आहे.

ठाकरे गटाकडून तीन पक्ष चिन्हांचा विचार केला जात आहे. उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल या तीन चिन्हांचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या तीन चिन्हाबाबत ठाकरे गट दावा करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. तसंच शिवसेना नाव वापरता येणार नाही. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. पण पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आता बदलावे लागणार आहे.

दरम्यान, दिल्ली शिवसेना ठाकरे गटाची सुप्रीम कोर्ट, निवडणूक चिन्ह आणि नवीन नावावर निर्णय घेण्यासाठी बैठक पार पडली. पहाटे 3 वाजेपर्यंत शिवसेना नेते, कायदे तज्ञ आणि सुप्रीम कोर्टातून वकिलासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर नावा संदर्भात तीन प्रस्ताव तयार करण्यात आले असून आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत निवडणूक चिन्ह आणि नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 फ्री निवडणूक चिन्ह आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Previous articleवाराणसी जाने वाली वंदे भारत एक्सप्रेस के पहिए हुए जाम, शताब्दी ट्रेन से भेजे गए यात्री
Next articleMaharashtra । निवडणूक आयोगाच्याविरोधात शिवसेना उचलणार मोठे पाऊल!
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).