Home School एनसीईआरटीचे नैपुण्यावरील सर्वेक्षण । अर्ध्यापेक्षा जास्त भारतीय मुले गणित-इंग्रजीत वर्ल्ड क्लास

एनसीईआरटीचे नैपुण्यावरील सर्वेक्षण । अर्ध्यापेक्षा जास्त भारतीय मुले गणित-इंग्रजीत वर्ल्ड क्लास

357

एनसीईआरटीने देशातील सर्व राज्यांच्या मुलांच्या नैपुण्यावर एक सर्वेक्षण केले आहे. 14 वर्षांखालील मुलांची गणित, इंग्रजी आणि त्यांचे मातृभाषेचे आकलन या मुद्द्यांच्या आधारे त्यांचे नैपुण्य तपासण्यात आले. देशातील 52% मुलांत गणिताचे आकलन त्यांच्या वयाच्या जगभरातील मुलांच्या तुलनेएवढे आहे, असे या सर्वेक्षणातून समोर आले. म्हणजे ते जागतिक स्तराचे (वर्ल्ड क्लास) आहे. अशाच प्रकारे मातृभाषा वेगाने शिकण्याच्या, लिहिण्याच्या आणि बोलण्याच्या बाबतीत पंजाबी भाषा बोलणारी मुले सर्वात पुढे आढळली. त्यात एक मिनिटाच्या आत शब्द वाचणे आणि समजून घेण्याचा वैश्विक निकष ठेवण्यात आला होता. पंजाबी भाषक विद्यार्थी सर्वाधिक 69% निपुण असल्याचे आढळले. आसामी आणि तामिळ भाषेच्या विद्यार्थ्यांचा स्तर सर्वात कमी म्हणजे 23% होता. सर्व्हेचा दुसरा पैलू असाही आहे की, तिसरीचे 11% विद्यार्थी बेसिक प्रश्नही सोडवू शकले नाहीत. इंग्रजीत 34% विद्यार्थ्यांची कामगिरी वैश्विक स्तरापेक्षा जास्त होती. 15% मुलांना इंग्रजीचे पायाभूत ज्ञानही नव्हते. 21% विद्यार्थ्यांना हिंदी चांगली समजू शकली नाही.

मप्र-उप्रची हिंदी भाषक मुले हिंदीतच मागे, मराठी मुलांचा मातृभाषा आकलनात चौथा क्रमांक गणित बंगाल, झारखंड, बिहारच्या मुलांचा स्तर देशात सर्वात चांगला प. बंगाल 53% 16% 69% झारखंड 55% 13% 68% बिहार 48% 18% 66% यूपी 49% 13% 62% हिमाचल 48% 11% 59%

-कर्नाटक (56%), राजस्थान (55%), केरळ (55%), पंजाब (53%), महाराष्ट्रातही (52%) अर्ध्यापेक्षा जास्त मुले गणितात वैश्विक पातळी गाठत आहेत. या सर्व राज्यांत १०% पेक्षा जास्त मुलांनी गणितात वैश्विक स्तरही पार केलेला आहे.

तामिळनाडू, गुजरात, चंदीगडच्या मुलांचा स्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षाही आहे कमी

-आसाम (46%), दिल्ली (47%) आणि हरियाणात (49%)अर्ध्यापेक्षा जास्त मुले वैश्विक स्तर गाठू शकली नाहीत.

इंग्रजी-हिंदी या दोन्ही भाषांवर स‌र्वात मजबूत पकड आहे हरियाणाच्या मुलांची (वैश्विक स्तर किंवा तो पार करणारे विद्यार्थी) इंग्रजी हिंदी हरियाणा 77% 65% झारखंड 66% 45% पंजाब 66% 61% दिल्ली 62% 50% इंग्रजी हिंदी राजस्थान 54% 42% मध्य प्रदेश 52% 41% उत्तर प्रदेश 52% 45% छत्तीसगड 48% 46%

मातृभाषा पंजाबी भाषक मुलांची आघाडी (एक मिनिटापर्यंत अचूक शब्द वाचणारी मुले) पंजाबी 69% हिंदी 47% मल्याळम 44% मराठी 44% गुजराती 43% कन्नड 41% बंगाली 37% तामिळ 23%

Previous articleमहारानी एलिजाबेथ का निधन | स्कॉटलैंड के बाल्मोरल कासल में अंतिम सांस ली, चार्ल्स बनाए गए किंग
Next articleNagpur । क्रेडाईचा प्रॉपर्टी एक्स्पो 7 ऑक्टोबरपासून
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).