चंद्रपूर : कोरोना मुळे लावन्यात आलेल्या लॉकडाउन च्या काळात बेरोजगार झाल्याने कित्येकांना आपन चोरी करतांना बघितले आहे. मात्र इथे आम्ही एका अशा चोरा बद्दल सांगणार आहोत जो हॉटेलात तर शिरला पण तिथे लॉकरमध्ये पैसे पडले असून सुद्धा त्याने चोरी केली नाही. उलट पोटभर जेवन करून तो माघारी परतला.
ही सत्य घटना महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपुर येथील आहे. सचिन हॉटेल मध्ये हा सर्व प्रकार घडला. मुख्य म्हणजे हॉटेलातील सीसीटीवी मध्ये हा सर्व प्रकार कैद ही झाला. मात्र हॉटेलच्या मालकाने जेव्हा सीसीटीवी फुटेज बघितले तेव्हा त्याला हॉटेलात घुसलेल्या चोराची केवळ प्रामाणिकता दिसली. तो गहीवरला आणि त्याने हा घडलेला प्रकार पोलीसांना न सांगण्याचा निर्णय घेतला.
- रक्कम बघूनसुद्धा चोराने दुर्लक्ष केले
मुख्य म्हणजे जेवणा नंतर तो चोर आपल्या घरच्यांसाठी काही खाण्याचे सामान खिशात घेवून निघुन गेला. यापूर्वी त्याने मालकाच्या टेबलाचे ड्रॉवर उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र, ती रक्कम जशीच्यातशी ठेवून तो निघून गेला. सीसीटीवी मध्ये हा सर्व प्रकार बघितल्या नंतर हॉटेलच्या मालकाने त्या युवकाच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले आणि पोलीसांना झालेला प्रकार न सांगण्याचे ठरविले.
चंद्रपुरात सचिन हॉटेल लोकवस्तीपासून थोडे दूर आहे. पण, अगदी हायवेवरच आहे. याच हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. चंद्रपुरात 10 सप्टेंबर पासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला होता. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. दुकाने, हॉटेल्स, रोजगार सारे काही बंद होते. हातावर आणून पानावर खाणाºया लोकांची यामुळे मोठी अडचण झाली.
रोजगार नाही, त्यामुळे पैसे नाहीत. मग खायचे काय, असा प्रश्न एका युवकाला पडला आणि शेवटचा उपाय म्हणून त्याने एका हॉटेलात घुसण्याचे ठरविले. 10 सप्टेंबरच्या रात्री हा युवक हॉटेल सचिनमध्ये घुसला. भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या त्या चोराने सर्वात आधी फ्रिजमधून पाण्याची बाटली काढली आणि मनसोक्त पाणी प्यायल्या नंतर लगेच जे हाती लागेल ते त्याने आरामात खाल्ले. काही खाण्याचे सामान खिशात भरले. यानंतर तो लगेच तिथुन निघुन गेला.