Home मराठी #Maha_Metro | स्वातंत्रता दिना दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप

#Maha_Metro | स्वातंत्रता दिना दिवशी मेट्रो प्रवाश्याची रेकॉर्ड रायडरशीप

406

तब्ब्ल ८५ हजार प्रवाश्यानी केला मेट्रो ने प्रवास

नागपूर ब्युरो : नागपूर मेट्रो अंतर्गत असलेल्या प्रवासी संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीने आज शिखर गाठले आणि आज (१५ ऑगस्ट) मेट्रोची प्रवासी संख्या ८५००० इतकी विक्रमी होती. प्रवासी संख्या वाढावी या करता महा मेट्रो तर्फे सर्वंकष होणाऱ्या प्रयत्नांचेच हे फलित आहे. या आधी २६ जून २०२२ रोजी मेट्रोने ६५,००० हि सर्वोच्च प्रवासी संख्या गाठली होती. आज जुने सर्व विक्रम महा मेट्रो नागपूर ने अभूतपूर्व असा पल्ला गाठला आहे.

नागपूरकरांच्या सहकार्यानेच हा पल्ला गाठला आहे. या मागे मेट्रोच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अनेक दिवसांची मेहनत आहे. नागपूरकरांना उत्कृष्ट सेवा मिळावी आणि त्यांनी याचा भरपूर लाभ घ्यावा या दृष्टीने महा मेट्रोने सातत्याने अनेक उपाययोजना केल्या.

फिडर सेवा: लास्ट माईल आणि फर्स्ट माईल कनेक्टिव्हीटी अंतर्गत महा मेट्रोने स्थानकावर फिडर सेवा उपलब्ध करून दिली. या अंतर्गत सायकल, इ-सायकल, इ-स्कूटर, इ-रिक्षा सारखे पर्याय प्रवाश्यांना दिले. या सोईंचा लाभ सरसकट सर्व प्रवाशांना तर झालाच पण विशेषतः मिहान भागात कार्यरत असलेल्या आणि हिंगणा परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ झाला.

मेट्रो सेवेच्या वेळा वाढवल्यात: प्रवाश्यांच्या मागणीचा महा मेट्रोने नेहमीच गांभीर्याने विचार केला आहे. म्हणून महा मेट्रोच्या वेळापत्रकात प्रवाश्यांच्या गरजे प्रमाणे बदल करण्यात आले. सध्या मेट्रोच्या दोन्ही ऑरेंज आणि ऍक्वा मार्गिकेवर सकाळी ६.३० ते रात्री १० वाजे पर्यंत मेट्रो सेवा असते. विशेषतः रविवारी सारख्या सुटीच्या दिवशी प्रवाश्यांचा ओघ बघता मेट्रो गाड्यांच्या वेळात त्या प्रमाणे बदल करण्यात आले.

महा कार्ड: डिजिटल पेमेंट हि काळाची गरज ओळखत महा मेट्रोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या साहायाने महा कार्डची सोय आपल्या प्रवाश्यांपर्यंत करून दिली. महा कार्डाच्या सोयीमुळे प्रवाशांना मेट्रोने प्रवास करणे अधिक सोपे झाले.

मोबाईल ऍप: महा कार्ड सोबत महा मेट्रोने मोबाईल ऍप ची सोया देखील प्रवाश्याना करून दिली. यामुळे देखील मेट्रोने प्रवास करणे अधिकच सोपे झाले कारण महा कार्ड आणि मोबाईल ऍप मुळे तिकीट काढण्याकरता रांगेत उभे राहण्याची गरज उरली नाही आणि म्हणून मेट्रोने प्रवास अधिक सुखकर झाला.

विविध कार्यक्रमांचे आयोजन: महा मेट्रोने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य विविध मेट्रो स्थानकांवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये चित्रकला स्पर्धा,फ्रिडम फायटर मेट्रो राईड,हर घर तिरंगा विश वॉल कॅम्पेन,मेट्रो स्टेशन येथे बँडचे सादरीकरण,देशभक्ती गीतांचे आयोजन,सेल्फी पॉईंट समावेश होता. नागपूरकरांना प्रवासाची योग्य सोय मिळावी या करता महा मेट्रो तर्फे सातत्याने प्रयत्न होत असतात. आज मेट्रोने प्रवासी संख्येच्या बाबतीत एक महत्वाचे टप्पा असून येत्या काळात हा आकडा याच प्रमाणे वाढणार असल्याचा विश्वास देखील आहे.

Previous article#Nagpur | खादी एवं ग्रामोद्योग आयोग ने निकाली तिरंगा रैली
Next articleNagpur | अदिति को मिलेगी वैश्विक पहचान – सुधाकर गायधनी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).