Home Maharashtra शिंदे सरकारचा विस्तार । 18 जणांचा शपथविधी, महिलांना संधी नाही, वादग्रस्त राठोड,...

शिंदे सरकारचा विस्तार । 18 जणांचा शपथविधी, महिलांना संधी नाही, वादग्रस्त राठोड, सत्तारांना लागली लॉटरी

राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात पार पडला. त्यात 50-50 फॉर्म्युल्यानुसार भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सत्ताधारी पक्षांसह विरोधी बाकावरील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी नाकारण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विशेषतः पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्रिपद गमावलेले आमदार संजय राठोड व टीईटी घोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळेही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनी स्वतःला आरशात पाहण्याचा सल्ला देत त्यांची टीका फेटाळून लावली आहे.

 

भाजपचे मंत्री

1. सुरेश खाडे 2. चंद्रकांत पाटील 3. राधाकृष्ण विखे-पाटील 4. गिरीश महाजन 5. अतुल सावे 6. रवींद्र चव्हाण 7. विजयकुमार गावित 8. सुधीर मुनगंटीवार 9. मंगलप्रभात लोढा

शिंदे गटाचे मंत्री

1. दादा भुसे 2. संदीपान भुमरे 3. उदय सामंत 4. शंभूराज देसाई 5. गुलाबराव पाटील 6. अब्दुल सत्तार 7. संजय राठोड 8. दीपक केसरकर 9. तानाजी सावंत