Home FILM Gadchiroli । गडचिरोलीची विद्यार्थिनी प्रतीक्षा शिवणकर मराठी मालिकेतील मुख्य पात्र रेवतीच्या भूमिकेत

Gadchiroli । गडचिरोलीची विद्यार्थिनी प्रतीक्षा शिवणकर मराठी मालिकेतील मुख्य पात्र रेवतीच्या भूमिकेत

गडचिरोली ब्युरो : “शिवाजी हायस्कूल चामोर्शीची “माजी विद्यार्थिनी कुमारी “प्रतीक्षा सुनील शिवणकर “ही “सोनी मराठी “या मानांकित असलेल्या मराठी वाहिनीवर दिनांक 18 जुलै 2022 संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होत असलेल्या “जीवाची होतिया काहीली” या मालिकेतील मुख्य पात्र रेवतीच्या भूमिकेत येत आहे .

शाळेत असता पासूनच तिला नृत्याची व अभिनयाची आवड होती. पुढील शिक्षणासाठी पुणे येथे गेल्यावर अभिनेता प्रशांत दामले यांच्या,” टी स्कूल थेटर अकादमी “मध्ये ती सहभागी झाली.

त्यानंतर प्रशांत दामले यांच्याच “एका लग्नाची पुढची_गोष्ट” या प्रसिद्ध व्यावसायिक नाटकातही तिने अभिनय करून देश-विदेशात 500 पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत.

यानंतर तिचा “कॉलेज डायरी “नावाचा मराठी सिनेमाही आलाय ,तर लॉकडाऊन नंतर “कलर्स मराठी वाहिनीवरील” ” कॉमेडी बिमेडी ” नावाचा शो देखील तिने केलाय.

प्रतीक्षा ची आई जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिभना पंचायत समिती गडचिरोली येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. तर वडील सुनील शिवणकर हे देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक पदावर कार्यरत आहेत. अभिनेत्री होऊन तिने “शिवाजी संस्थाच” नाही तर गडचिरोली जिल्ह्याचा नाव देखील मराठी श्रुष्टित उमटविला आहे.

Previous articleICSE मंडळाचा 10 वीचा निकाल । महाराष्ट्राच्या पुण्याची मथारू टॉपर्समध्ये, महाराष्ट्राचा 100 टक्के निकाल
Next articleBollywood । ट्विन्स के पेरेंट्स बनेंगे रणबीर-आलिया?: रणबीर ने खुलासा करते हुए कहा- मेरे जुड़वां बच्चे होने वाले हैं
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).