Home Maharashtra ICSE मंडळाचा 10 वीचा निकाल । महाराष्ट्राच्या पुण्याची मथारू टॉपर्समध्ये, महाराष्ट्राचा 100...

ICSE मंडळाचा 10 वीचा निकाल । महाराष्ट्राच्या पुण्याची मथारू टॉपर्समध्ये, महाराष्ट्राचा 100 टक्के निकाल

आयसीएसई दहावी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. पुण्याची हरगुन कौर मथारू, अनिका गुप्ता (कानपूर), पुष्कर त्रिपाठी (बलरामपूर) आणि कनिष्क मित्तल (लखनऊ) या चौघे टॉपर्स ठरले आहेत. महाराष्ट्राचा १००% निकाल लागला आहे.

पहिल्या तीन स्थानांवर एकूण ११० विद्यार्थी असून तीन रँकमध्ये केवळ एक-एक गुणाचे अंतर आहे. चार विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळवले आहेत. ३४ विद्यार्थी ४९८ गुण मिळवून द्वितीय स्थानी आहेत. ७२ विद्यार्थ्यांनी ४९७ गुण मिळवून तिसरे स्थान मिळवले आहे. सीआयएसईने दोन वर्षांनंतर गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

द्वितीय स्थान मिळवणाऱ्या ३४ विद्यार्थ्यांत ८ महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये अमोलिका अमित मुखर्जी,आद्या गौर, वेदांग खार्ये , वर्षा शाम सुंदर, पवित्रा प्रसाद आचर, अनन्या प्रमोद नायर (सर्व मुंबई) विधी चौहान (पुणे) शिवानी ओंकारनाथ देव (पुणे) यांचा समावेश आहे.

Previous articleकोकणासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; 11 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवले
Next articleGadchiroli । गडचिरोलीची विद्यार्थिनी प्रतीक्षा शिवणकर मराठी मालिकेतील मुख्य पात्र रेवतीच्या भूमिकेत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).