Home मराठी कोकणासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; 11 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवले

कोकणासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; 11 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवले

  • या जिल्ह्यांना यलो अलर्ट – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, वाशीम, चंद्रपूर, भंडारा. नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली. नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.
  • या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट – गोंदिया, गडचिरोली

मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे, गडचिरोली, गोंदियासह कोकण व मुंबईत आज सकाळपासून संततधार सुरु आहे. कोकणासह विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे 104 नागरिकांनी जीव गमावला आहे, तर 189 प्राणी दगावले आहेत. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, दनगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग अशा एकूण 23 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात पिकांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. 275 गावांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.

गडचिरोलीत 24 तासांत 20 मिमी पाऊस पडला असून येथील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत. गोदावरी आणि इंद्रावती धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. येथील नागरिकांसाठी 35 मदत केंद्र उघडण्यात आली आहेत.

Previous articleChandrapur | पत्रकारांना आणखी सुवर्ण संधी, श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार प्रवेशिकेला मुदत वाढ
Next articleICSE मंडळाचा 10 वीचा निकाल । महाराष्ट्राच्या पुण्याची मथारू टॉपर्समध्ये, महाराष्ट्राचा 100 टक्के निकाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).