Home हिंदी आढावा बैठक : नोव्हेंबर अखेरपर्यत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणार : सामंत

आढावा बैठक : नोव्हेंबर अखेरपर्यत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणार : सामंत

508
0

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक

नागपूर : कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठांची परिक्षा प्रक्रीया नोव्हेंबर अखेरपर्यत पूर्ण करण्यात येतील. अंतिम वर्षाच्या पदवी परिक्षा बहूपर्यायी उत्तरांचे वस्तुनिष्ठ प्रश्न (एमसीक्यू) पध्दतीने होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज नागपूर येथे दिली. विद्यापीठ परिसरातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात परिक्षांच्या संदर्भात आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी प्रकाश गजभिये, आ. दुष्यंत चतुर्वेदी, कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी उपस्थित होते.

फेसबुक लाईव्ह करण्याच्या सुचना

आज गोंडवाना विद्यापीठासोबत नागपूर विद्यापीठातही उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी परिक्षांबाबत आढावा घेतला. परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. साबळे यांनी विद्यापीठाच्या परिक्षा घेण्याच्या तयारीचे विस्तृत सादरीकरण यावेळी केले. 77 हजार 925 विदयार्थी हे अंतिम वर्षाची परिक्षा देणार असुन 1882 विषयांची परिक्षा घेण्याचे नियोजन आहे. विद्यापीठाच्या परिक्षेच्या नियोजनावर ना. सामंत यांनी समाधान व्यक्त केले .कोणताही ताण न घेता परिक्षेला सामोरे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी कुलगुरू व परिक्षा संचालकांनी फेसबुक लाईव्ह करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

प्रशासन व विद्यापीठा ने समन्वयाने परिक्षा घ्याव्यात

ऑनलाईन एमसीक्यु पध्दतीने घेण्यात येणा-या परिक्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जास्त वेळ न दवडता ए‍क ते दिड महीन्यात लगेच परिक्षा घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश ही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिले. परिक्षा घेणे ,नापास विदयार्थ्याची पुन्हा 15 दिवसात परिक्षा घेणे ही सर्व प्रक्रीया नोव्हेंबर पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासन व विद्यापीठा ने समन्वयाने परिक्षा घ्याव्यात . परिक्षा घेण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही ना. सामंत यांनी यावेळी दिली.

Previous article‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम प्रभावीपणे राबवूया : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
Next articleखुलासा : पीएम मोदी, सोनिया गांधी सहित हजारों भारतीयों की जासूसी कर रहा था चीन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here