Home मराठी JEE Exam । 14 टॉपर्समध्ये फक्त 1 मुलगी, 7 आंध्र-तेलंगण विद्यार्थ्यांचा समावेश,...

JEE Exam । 14 टॉपर्समध्ये फक्त 1 मुलगी, 7 आंध्र-तेलंगण विद्यार्थ्यांचा समावेश, जेईई मेन्स सेशन-1 चा निकाल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स सेशन-१ चा निकाल सोमवारी जाहीर केला. १४ टॉपर्समध्ये आसामची स्नेहा पारीक एकमेव मुलगी आहे. स्नेहाने १०० एनटीए स्कोअर प्राप्त केला. जेईई मेन्समध्ये खूप कमी विद्यार्थिनींना यश मिळू शकले. टॉपर्सच्या यादीत दक्षिणेतील राज्यांचा दबदबा राहिला.

टॉपर्समधील एकमेव मुलगी स्नेहा पारीक कोटात तयारी करत आहे. मी १२ तास अभ्यास करत असल्याचे तिने सांगितले. आयआयटी मुंबईमध्ये कॉम्प्युटर सायन्स करण्याचे तिचे ध्येय आहे.

नागपूरचा अद्वय क्रिष्णा ९९.९९ पर्सेंटाइलसह महाराष्ट्रात पहिला आला. अद्वयने सीबीएसई बारावीची परीक्षा दिली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. त्याने राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतही यश मिळवले.

एनटीएनुसार, या परीक्षेसाठी सर्व श्रेणीत मिळून ८,७२,४३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, परीक्षा ७,६९,५८९ विद्यार्थ्यांनीच दिली. म्हणजे जवळपास १,०२,८४३ विद्यार्थी परीक्षेस बसले नाहीत.

Previous articleमहाराष्ट्र चिंब । अनेक घाटांत दरडी कोसळल्या, राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, एनडीआरएफ ची पथके तैनात
Next articleपूर परिस्थिती ची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचे मुंबई साठी प्रयाण
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).