Home मराठी पूर परिस्थिती ची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचे मुंबई साठी प्रयाण

पूर परिस्थिती ची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचे मुंबई साठी प्रयाण

नागपूर ब्युरो : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्री ११.४५ मिनिटांनी विशेष विमानाने मुंबईसाठी प्रयाण झाले.

विमानतळावर विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, जिल्हाधिकारी आर विमला , सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीसआयुक्त अश्वती दोरजे, तसेच पोलिस, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर गडचिरोली येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतला, खराब हवामानामुळे हेलिकॅप्टर ऐवजी रस्ते मार्गाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथील प्रत्यक्ष पूरपरिस्थिती व बाधित भागाची पाहणी केली त्यानंतर नागपूर येथील विमानतळावरून विशेष विमानाने रात्री अकरा पंचेचाळीस वाजता प्रयाण केले.

Previous articleJEE Exam । 14 टॉपर्समध्ये फक्त 1 मुलगी, 7 आंध्र-तेलंगण विद्यार्थ्यांचा समावेश, जेईई मेन्स सेशन-1 चा निकाल
Next articleनागपूरमधील धक्कादायक घटना। पुराच्या पाण्यात वऱ्हाड गेले वाहून ; गाडीतील आठपैकी तिघांचे मृतदेह मिळाले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).