Home मराठी Maharashtra । विश्वासदर्शक ठराव जिंकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा

Maharashtra । विश्वासदर्शक ठराव जिंकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा

इंधनावरील व्हॅट कमी करणार : पंतप्रधानांनी आवाहन करूनही ठाकरेंनी नाकारलेला प्रस्ताव शिंदे पूर्ण करणार
जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर कमी केला होता. राज्यांनाही कर कमी करण्याच्या सूचना केल्या होत्या. ठाकरे सरकारने यावर निर्णय घेतला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहातच लवकरच सरकार इंधनावरील व्हॅट कमी करेल, असे सांगितले.

राज्य शेतकरी आत्महत्या मुक्तीचा संकल्प : शेतकरी हितासाठी सरकारसह विरोधी पक्षांचे सहकार्य आवश्यक
राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांची अनेक जण विचारपूस करतात. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. हे सरकार शेतकरी, सर्वसामान्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे, समृद्धीचे दिवस यावेत यासाठी सरकार लवकरच योजना आणेल. आम्ही राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हिरकणी गावासाठी २१ कोटींचा निधी : गावाच्या विकासासाठी भरत गोगावलेंच्या मागणीवर लगेचच घोषणा
हिरकणी या गावाच्या विकासाबाबत मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रायगड जिल्हा हा आमच्यासाठी अस्मिता आहे. ज्या हिरकणीने इतिहास घडवला, ते गाव वाचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून २१ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले.

Previous articleउद्धव ठाकरेंचा आरोप । भाजपकडून शिवसेना संपवण्याचा डाव: हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या
Next article#Maha_Metro | महा मेट्रोला प्रतिष्ठित आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स प्राप्त
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).