Home मराठी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल | शिंदेसह 13 आमदार गुजरातमध्ये ; विधान परिषद...

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल | शिंदेसह 13 आमदार गुजरातमध्ये ; विधान परिषद निवडणुकीत आमदार फुटल्याने शिवसेनेत नाराजी 

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले असून, ते काल संध्याकाळापासून नॉट रिचेबल आहेत. निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या फुटीमुळे शिंदे हे नाराज असल्याचे कळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईत वर्षांवर बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे काही आमदार देखील गुजरातला आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतल 13 आमदार असल्याची माहिती आहे. काल संध्याकाळपासून महाविकास आघाडीतील अनेक जण शिंदेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते फोन घेत नाहीये. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आले होते. व्युहरचना जेव्हा आखण्यात येत होती तेव्हा शिंदेना साईडलाईन करण्यात आले होते.

दरम्यान, याप्रकरणी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, या सगळ्या अफवा आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. नॉट रिचेबलमध्ये काहीच तथ्य नाहीत.

शिवसेना खासदार संजय राऊत हे आज दिल्लीला जाणार होते मात्र, एकनाथ शिंदे नाराज असल्याने तसेच आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक असल्याने त्यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्यासोबत मंत्री उदय सामंत यांचा देखील रत्नागिरी दौरा रद्द झाला असून, सामंत आणि राऊत आज मुंबईतच थांबणार आहेत.