Home Maharashtra आज शिवराज्याभिषेक दिन । हजारो शिवप्रेमी रायगडावर, 2 वर्षांनंतर भव्यदिव्य होणार राज्याभिषेक...

आज शिवराज्याभिषेक दिन । हजारो शिवप्रेमी रायगडावर, 2 वर्षांनंतर भव्यदिव्य होणार राज्याभिषेक सोहळा

आज शिवराज्याभिषेक दिन. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा शिवराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी रायगडवर दाखल होत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची ‘शिवराय मनामनात-शिवराज्याभिषेक घराघरांत’ही संकल्पना आहे. या संकल्पनेनूसार रायगडावर अत्यंत भव्यदिव्यपणे हा सोहळा आज साजरा केला जाणार आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. रायगडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे सायंकाळी अंधार पडताच किल्ले रायगड या रोषणाईने उजळून निघणार आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे अन्नछत्र उभारण्यासह राजसदर फुलांनी सजविण्यात आले आहे. भवानी पेठ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे.

आज ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे यांच्या हस्ते दरबार पुरोहितांच्या मंत्रघोषात शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक होईल. शिवरायांच्या पालखीची रायगडावर प्रदक्षिणा होईल व त्यानंतर या सोहळ्याची सांगता होणार आहे. सोहळ्यासाठी कालच संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे रायगड येथे दाखल झाले आहेत.

Previous articleNagpur । सरस मेळाव्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन : डॉ. नितीन राऊत
Next articleMaharashtra । निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).