Home Nagpur NAGPUR । यूपीएससीमध्ये सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या 3 विद्यार्थ्यांची बाजी

NAGPUR । यूपीएससीमध्ये सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या 3 विद्यार्थ्यांची बाजी

नागपूर ब्युरो : देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (३० मे) जाहीर झाला. यात महाराष्ट्रासह उपराजधानीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. शुभम भैसारे (९७ वी रँक), सुमीत रामटेके (३५८ वी रँक) व शुभम नगराळे (५६८ वी रँक) हे तीन विद्यार्थी आहेत.

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यामुळे अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा होती.

वर्ध्याच्या आकांक्षा तामगाडगेला देशपातळीवर ५६२ वी रँक सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी डॉ. आकांक्षा तामगाडगे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. तिची देशपातळीवरील रँक ५६२ आहे. तिने परराष्ट्र सेवेत जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. ती २०१८ मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षेच्या तयारीला लागली होती. तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे तिने सांगितले. तर आयएएस प्रशिक्षण केंद्राचा शुभम भैसारे हा गोंदिया जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सौंदडचा रहिवासी आहे. २०१७ मध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तो दिल्लीत नोकरीला होता. त्याने चौथ्या प्रयत्नात आयएएसची परीक्षा ?उत्तीर्ण केली. सध्या तो दिल्लीत नोकरीला आहे.

Previous article#Maha_Metro | ट्रेन रॅपिंगला व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद
Next article#Maha_Metro | रात्री १० वाजता पर्यंत मेट्रो सेवा, आता सकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).