Home मराठी महंगाई डायन | घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ, किंमत 1...

महंगाई डायन | घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 3.50 रुपयांनी वाढ, किंमत 1 हजार रुपयांच्या पुढे

एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ सुरुच आहे. आज एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 3.50 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 8 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच देशात एलपीजी सिलिंडरची किंमत 1005 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य आधीच होरपळत असताना या दरवाढीमुळे त्यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 8 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडरसाठी आता 2354 रुपये मोजावे लागणार आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसाठी नवीन दर अनुक्रमे 2454 रुपये, 2306 रुपये आणि 2507 रुपये आहेत. हातगाडी, ठेला, लहान हॉटेल, अशा किरकोळ व्यावसायिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

7 मे 2022 रोजी देशात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी सिलिंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. त्यानंतरही मे महिन्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतीही तेव्हा आठ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

Previous articleआधी नक्षली होतो आता ठाणेदार, हात मिळवायचाय … अन् मुख्यमंत्र्यांनी जवानाची घेतली गळाभेट
Next articleआणखी 2 दिवस 42 ते 43 अंशांवर राहणार तापमान, सध्यातरी उकाड्यापासून सुटका नाही
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).