Home मराठी IIM Nagpur | आयआयएम कॅम्पसच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींचा 8 मे रोजी नागपूर दौरा

IIM Nagpur | आयआयएम कॅम्पसच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींचा 8 मे रोजी नागपूर दौरा

132 एकर वर साकारलाय परिसर, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उपस्थित राहतील

नागपूर ब्युरो : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या नव्या इमारती व परिसराचे उद्घाटन 8 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे सात मे रोजी नागपुरात येणार आहेत. ते या कार्यक्रमात उपस्थित राहतील.

132 एकर परिसरावर आयआयएम नागपूरचे कॅम्पस साकारले आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे. मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सध्या येथे 668 विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे पर्यावरण दृष्ट्या येथील इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड देखील करण्यात आली आहे. या ठिकाणी 20 हायटेक क्लासरूम आणि 24 प्रशिक्षण केंद्र व 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे.

या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात अर्जुनाच्या भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले आहे. विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप व नीड कम मेरीट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. आयआयएमच्या विस्तार योजनेत आगामी काळात एकूण सात सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना करण्यात येणार आहे.

आठ मे 2022 रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रपती या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यासाठी कार्यक्रम स्थळी सर्वं निमंत्रितांना नऊ वाजता पोहोचणे आवश्यक आहे. यापूर्वी 23 एप्रिल ला राष्ट्रपतींच्या हस्ते या विस्तारित कॅम्पस चे उद्घाटन होणार होते. मात्र दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता हा उद्घाटन सोहळा आठ मे रोजी होत आहे.

Previous articleशासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा – डॉ. माधवी खोडे-चवरे
Next articleसलमान खानला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने समन्सवरील स्थगिती 13 जूनपर्यंत वाढवली
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).