Home Social #Nagpur | शांतीवन चिंचोलीत, धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांचा स्मृती दिवस व धम्मशिबीर...

#Nagpur | शांतीवन चिंचोलीत, धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांचा स्मृती दिवस व धम्मशिबीर समारोह संपन्न

नागपूर ब्यूरो: परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत निकटचे सहकारी आणि नागपूरची धम्मदीक्षा ज्यांनी घडविली असे धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांचा 3 मे 2022 ला 16 वा स्मृती दिवस शांतीवन चिंचोली येथे भारतीय बौद्ध परिषदेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी मंचकावर अध्यक्ष स्थानी शेखर गोडबोले, प्रमुख पाहुणे संजय पाटील, प्रा. सुशांत चिमनकर, शशीकांत राऊत, तथा धम्म सेविका वर्षाताई उपस्थित होते.

या प्रसंगी सर्व मान्यवरांनी धम्मसेनापती यांच्या एकूण जीवन कार्यावर प्रकाश टाकला व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानिमित्त पी. डब्लू. च्या कॉलेज नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय धम्मशिबिर व व्यक्तिमत्व विकास यावर वर्षाताई यांनी शबीरार्थींना यथा योग्य उपयोगी मार्गदर्शन केले.या शिबिरात 100 पेक्षा जास्त विदयार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले, तर संचालन प्रदीप लामसोंगे यांनी व आभार प्रकाश सहारे यांनी मानले. कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी चंद्रमनी लवात्रे, प्रवीण पाटील, राहूल भैसारे, धम्मपाल दुपारे, माधवी सरोदे, गजानन नितनवरे, आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleकर्जदारांना झटका । गृह, वाहन कर्ज महागणार, ईएमआय मध्ये मोठी वाढ
Next articleमहंगाई डायन खाय जात है । 10 वर्षांत तेल 140%, दूध 72%, तर सोने 58 टक्क्यांनी महागले
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).