Home मराठी नाना पटोले । मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांना सुपारी...

नाना पटोले । मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांना सुपारी दिली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा एक मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडली. राज ठाकरेंच्या भाषणानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. असह्य झालेली महागाई आणि बेरोजगारीवरुन लक्ष उडवून मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांना सुपारी दिली आहे. पण या सुपारीबाजाला जनता ओळखून आहे. त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर हल्लाबोल केला आहे. तसेच नाना पटोले यांनी सलग ट्विट करत भाजपवर हल्लाबोले केला आहे.

भाजप सरकारने अशी बरबादी पसरवली आहे की देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कमीत कमी बारा वर्षे लागतील. वीज, गॅस उत्पादन, पाणी पुरवठा, व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, प्रसारणाशी संबंधित संवाद सेवा या क्षेत्रांची मोदी सरकारच्या काळात पार वाताहत झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदीजी आणखी किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही? असा सवालही त्यांनी केला.

केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटीची वसुली करते. पण महाराष्ट्राला मदत करण्याच्या नावावर सतत राजकारण करीत असते, असेही नाना म्हणाले. याशिवाय, देशातील 50 टक्के प्रलंबित खटल्यांसाठी केंद्रातील सरकारची संसदीय अकार्यक्षमता जबाबदार ठरली असल्याची टीका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादेखत केली. तसेच न्यायाधीशांची अपुरी संख्या आणि पायाभूत सुविधांच्या अभावाकडेही त्यांनी लक्ष वेधल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Previous articleमनसेची 3 मेची महाआरती रद्द, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर तणाव येऊ नये म्हणून 4 मे रोजी आयोजन
Next articleदो घंटे में ही 4 करोड़ से ज्यादा पर बिडिंग, LIC पॉलिसी होल्डर्स का 100% कोटा भरा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).