Home मराठी Maharashtra । चालू वर्षांत अडीच लाख बेरोजगारांना मिळणार रोजगार

Maharashtra । चालू वर्षांत अडीच लाख बेरोजगारांना मिळणार रोजगार

राज्यात चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत २५ हजार बँकांमार्फत उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून किमान अडीच लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्यात कोविडमुळे अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे या बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त उद्योगांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग यामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये सेवा, उत्पादन उद्योगांसाठी १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी विविध बँकांकडे लाभार्थींचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. दरम्यान, एका उद्योगातून किमान १० बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चालू आर्थकि वर्षात २५ हजार उद्योगांसाठी कर्ज दिले जाणार असल्यामुळे किमान २.५० लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Previous articleविदर्भ तापला । वर्धा, अकोला, चंद्रपूरमध्ये पारा 44.8 वर; आजपासून चार दिवस बेमोसमी पावसाचाही अंदाज
Next articleकोरोना । केंद्र की दिल्ली समेत 5 राज्यों को चेतावनी; आज स्कूल बंद करने पर हो सकता है फैसला
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).