Home Social बाबासाहेबांच्या विचारांना अंगीकृत करावे – दादाकांत धनविजय

बाबासाहेबांच्या विचारांना अंगीकृत करावे – दादाकांत धनविजय

नागपूर ब्यूरो: स्वामीधामनगरी, घोगली येथे विश्व रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, नाटककार व दिग्दर्शक दादकांत धनविजय, जिल्हा परिषद सदस्या मेघा मानकर, गट ग्रामपंचायत पीपळल्याचे – घोगली सरपंच नरेश भोयर , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एस.आर. नेहारे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महिला मंडळीच्या बुद्ध वंदनेने झाली.याप्रसंगी सरपंच नरेश भोयर यांनी समस्त ग्रामस्थांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकत असतांना ते म्हणाले, भारतीय संविधानामुळे आज आम्ही आपले कार्य सुरळीत चालवून राहालो. मेघा मानकर म्हणाल्या,बाबासाहेबांनी राज्य घटनेमध्ये दिलेल्या अधिकारामुळेच आज मी या पदावर पोहोचले व जनतेची सेवा करण्याचा मान मिळाला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात दादाकांत म्हणाले,बाबासाहेबांचे जीवनच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दिलेल्या विचारांना, बुद्धाच्या धम्माला आज अंगीकृत करण्याची नितांत गरज आहे. आज तरुण पिढी आपल्या ध्येयापासून भरकटत चालली आहे, तिला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आई- वडीलांची, गुरुजन्नांची आहे. समाजामध्ये काम करत असतांना सकारात्मक गोष्टींवर भर द्यावे. नवोदितांना नाट्य व कला क्षेत्रात खूप संधी आहे. जिद्द, चिकाटी व सरावाने यशोशिखर गाठता येते, असेही ते म्हणाले. उत्सव समितीच्या अध्यक्ष नेहारे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्या जीवनावर प्रकाश पळून त्यांनी स्वतः ची आणि त्यांच्या समाजाची प्रगती कशी घडवून आणली त्याबद्दल आपला अनुभव कथन केले. प्रतिभा वारेकर यांनी देखिल आपले विचार व्यक्त केले.यावेळी मुलांच्या वकृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये परिसरातील मुलांनी हिरीहिरीने भाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन उत्सव समितीचे सचिव राजेश सोनटक्के यांनी केले तर आभार जीतेन वासनिक यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज फुलपाटील, रमेश कदम, अशोक सांगोळे, निशित थुलकर, शंकर खाडे, मोठे, हरीश भगत, धनविजय, कांबळे, प्रमोद रामटेके, मिलिंद गवळी, जयेंद्र लोणारे, शशी, शावलीन कांबळे, सरोज रामटेके, परिलता सांगोळे, रंजना मोठे, जयश्री सुरवाडे, हेमलता सोनटक्के, शुभांगी चवरे, सुकेशनी फुले, भावना बाराहाते,शिल्पा मेश्राम, सुजाता ढोके, श्वेता शेट्ये आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleयुक्रेनला नव्याने उभारणीसाठी 38 लाख कोटी रुपयांची गरज, रशियाचे 500 रणगाडे, 2 हजार सशस्त्र वाहनांची हानी
Next article#Maha_Metro | इसासनी व एम्स के लिए मेट्रो फीडर बस फेरियो में वृद्धि
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).