Home मराठी माजी गृहमंत्री देशमुखांना कारागृहातून हलवले, आता सीबीआय कोठडी

माजी गृहमंत्री देशमुखांना कारागृहातून हलवले, आता सीबीआय कोठडी

मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ताब्यात घेतले. मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर पीएमएलएन न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. बुधवारी त्यांना आर्थर रोड कारागृहातून बाहेर काढून सीबीआय कोठडीत हलवले. भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी वाझे, शिंदे, पलांडे यांना सोमवारी सीबीआयने अटक केली.

सीबीआयने ताब्यात घेण्याच्या आदेशाला देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत आव्हान दिले. या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्या. पी. डी. नाईक यांनी नकार दिला. मात्र, न्यायमूर्तीद्वयींनी नकाराचे कारण नमूद केले नाही. त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती याची सुनावणी अन्य कुणा न्यायमूर्तींकडे सोपवतील.

Previous articleआयएनएस विक्रांतच्या नावाखाली 56 कोटी गोळा करून फसवणाऱ्या सोमय्या पिता-पुत्रांना जेल अटळ
Next article#Nagpur | ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भिक्षु झालेले गगन मलीक यांनी दिली सदिच्छा भेट
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).