Home मराठी #Nagpur | ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भिक्षु झालेले गगन मलीक यांनी दिली...

#Nagpur | ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भिक्षु झालेले गगन मलीक यांनी दिली सदिच्छा भेट

तथागत गौतम बुद्धांच्या शांती, मैत्रीचा संपूर्ण देशात प्रचार व प्रसार करणार – गगन मलीक

नागपूर ब्यूरो: गगन मलीक यांनी श्रीलंकेचे महान लेखक व निर्देशक नवीन कुमार यांनी तयार केलेला सिद्धार्थ गौतम बुद्ध या चित्रपटामध्ये तथागत गौतम बुद्धांची भुमीका केली आणि ते श्रीलंकेमध्ये फार प्रसिद्ध झाले पण त्यापेक्षा थायलंड मध्ये सुद्धा त्यांच नाव या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला.
थायलंड आणि श्रीलंका मध्ये भगवान बुद्धांच्या धम्माचं सर्व कार्य बघत असतांना मोठया प्रमाणामध्ये बुद्धमय असलेल्या या देशांची पाहणी करत असतांना ते प्रभावित झाले आणि त्यांनी श्रामनेर होण्याचा निर्णय घेतला. दोन महीण्यापूर्वी थायलंड येथे गगन मलीक यांनी श्रामणेरची दिक्षा घेतल्यानंदर भारतातील बौद्ध प्रमुख स्थळी भेट देत आहेत. नुकतेच त्यांनी बुद्धगया, कुशीनगर, सारनाथ येथे भेट देऊन नागपूर येथे आगमन केले व ड्रॅगन पॅलेज टेम्पल येथे सदिच्छा भेट देऊन नागपूर येथील दिक्षा भुमीला प्रमुख कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी ड्रॅगन पॅलेजच्या प्रमुख अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सकाळी नियमित होणाºया बुद् वंदनेत व जॅननीस् चॅटींग मध्ये गगन मलीक व थायलंड येथील भिक्षु संघ सहभागी झाले. या वेळी थायलंडच्या भिक्षु संघाने थाई पद्धतीची बुद्ध वंदना सुद्धा केली.
मार्गदर्शन करित असतांना श्रामनेर गगन मलीक यांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म हा मार्ग दाखवणारा असुन या मार्गावर जो व्यक्ती चालण्याचा प्रयत्न करेल तो सुखी व समाधानी जिवन जगु शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तींनी तथागत गौतम बुद्धांच्या शांती व मैत्रीच्या विचाराचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणात करण्याचा निर्धार सुद्ध त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
थायलंड येथील भिक्षु संघाने अ‍ॅड़ सुलेखाताई कुंभारे यांना थायलंड येथुन आणलेली अप्रतिम भगवान गौतम बुद्धांची मुर्ती दान केली व धम्म कार्यासाठी सुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठया संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते.

Previous articleमाजी गृहमंत्री देशमुखांना कारागृहातून हलवले, आता सीबीआय कोठडी
Next articleबारकडून वसूल 4 कोटी 70 लाख शिक्षण संस्थेत वळवले, अनिल देशमुख हेच याचे खरे मास्टरमाइंड : ईडी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).