Home मराठी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली 56 कोटी गोळा करून फसवणाऱ्या सोमय्या पिता-पुत्रांना जेल अटळ

आयएनएस विक्रांतच्या नावाखाली 56 कोटी गोळा करून फसवणाऱ्या सोमय्या पिता-पुत्रांना जेल अटळ

आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून 56 कोटी गोळा करून जनतेला फसवणाऱ्या किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाला जेलमध्ये जावेच लागणार. माझे वाक्य नोंद करून ठेवा, असा इशारा आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच. पण, देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपला जाब विचारावाच लागेल, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

गुन्हे प्रक्रिया कायदा दुरुस्ती विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी कायद्याच्या गैरवापराबद्दल आसूड ओढले. नव्या कायद्याचा गैरवापर होणार नाही हे गृहमंत्री म्हणत आहेत. मग सध्या देशात काय सुरू आहे, असा सवाल त्यांनी केला. 102 वर्षांपूर्वींचा कायदा बदलला जातोय. मन स्वच्छ असेल तर विरोध करण्याचे कारण नाही. पण गुन्हेगार कोण आहे? जो तुम्हाला प्रश्न विचारणार तो गुन्हेगार बनतो, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, गुन्हे प्रक्रिया कायद्यामध्ये होणारे बदल चांगले आहे. मात्र, या कायद्याचा गैरवापर होणार नाही. हे तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकाल काय, असा सवालही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला.

Previous articleनीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी, यंदा 3 तास 20 मिनिटांचा पेपर, जेईई मेनच्या दोन्ही तारखांत बदल
Next articleमाजी गृहमंत्री देशमुखांना कारागृहातून हलवले, आता सीबीआय कोठडी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).