Home Exam नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी, यंदा 3 तास 20 मिनिटांचा पेपर,...

नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी, यंदा 3 तास 20 मिनिटांचा पेपर, जेईई मेनच्या दोन्ही तारखांत बदल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बहुप्रतीक्षित नीटची अधिसूचना बुधवारी रात्री जारी केली. या वर्षी नीट १७ जुलैला होईल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती सहा मेपर्यंत चालेल. यंदा परीक्षेच्या वेळेत २० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षापर्यंत परीक्षा तीन तासांची होती. या वर्षी ती ३ तास २० मिनिटांची असेल.

नीटमध्ये या वर्षी २०० प्रश्न विचारले जातील. गेल्या वर्षी त्यापैकी १८० प्रश्नच सोडवायचे होते. अर्जासाठीचे शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १६०० रुपये, जनरल ईडब्ल्यूएस व ओबीसी एनसीएलसाठी १५०० आणि एससी, एसटी, दिव्यांग व थर्ड जेंडरसाठी ९०० रुपये असेल. ही परीक्षा देशातील ५४३ शहरांसह विदेशातील १४ शहरांत आयोजित केली जाईल. हिंदी व इंग्रजीसह १३ भाषांत परीक्षा होईल. एनटीएने जेईई मेनचे शेड्यूलही बदलले आहे.

जेईई मेनचे पहिले सत्र (एप्रिल) आता २० ते २९ जूनपर्यंत असेल. दुसरे सत्र (मे) २१ ते ३० जुलैपर्यंत असेल. जेईई अॅडव्हान्स्ड सध्या ३ जुलैला प्रस्तावित आहे. जेईई मेन तारखांमधील बदलामुळे जेईई अॅडव्हान्स्डचे शेड्यूल बदलणे निश्चित आहे. जेईई मेनच्या निकालाआधी अॅडव्हान्स्ड शक्य नाही.

Previous articleसंजय राऊत । ‘आयएनएस विक्रांत’ फाईल : किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी सर्वसामान्यांकडून 58 कोटी जमा केले
Next articleआयएनएस विक्रांतच्या नावाखाली 56 कोटी गोळा करून फसवणाऱ्या सोमय्या पिता-पुत्रांना जेल अटळ
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).