Home मराठी कुणी कुणासोबतही युती करो आम्हाला काहीच फरक पडणार नाही

कुणी कुणासोबतही युती करो आम्हाला काहीच फरक पडणार नाही

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. कुणी कुणासोबत युती करो आम्हाला काही फरक पडत नाही. जनता मोदीसोबत आहे. शिवसेनेने हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाही तर जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे, राज्यात सध्या अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्र येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी शिवसेनेला अनेक टोले लगावले आहेत.

लोकांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींना पाहून लोक मतदान करतात. विकासाला मतदान करतात. हे लोक एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्र येतात ते पाहावे लागेल. जे लोक अजानची स्पर्धा घेऊ शकतात ते काहीही करू शकतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.यावेळी बोलताना फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावरदेखील टीका केली आहे. मलिक यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत. मात्र शेवटी संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Previous articleआज पासून नागपुरात सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन, 22 मार्च पर्यंत धरमपेठ येथे आयोजन
Next articleऔरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे आमच्यासोबत असणार नाहीत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).