Home Nagpur #Maha_Metro | मेट्रो भवनात झाला महिला दिन साजरा

#Maha_Metro | मेट्रो भवनात झाला महिला दिन साजरा

नागपूर ब्युरो : महाराष्ट्र मेट्रो रेल प्रकल्पाच्या अंतर्गत नागपूर मेट्रोच्या विविध कार्यालयात तसेच स्थानकावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या प्रकल्पातील सर्व विभागातील समस्त महिला सहकाऱ्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या कार्यप्रणालीनुसार महा मेट्रोमध्ये ट्रेन ऑपरेटरपासून ते तांत्रिक आणि कार्यालयीन कार्य करणाऱ्या महिलांना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाते. महा मेट्रोत पुरुषांबरोबरीने कार्य करत सर्व महिलांनी या एवढ्या मोठ्या कामाचा आपापला वाटा योग्य पद्धतीने उचलला असल्याचे, त्यामुळेच महामेट्रोच्या आजवरच्या यशात देखील त्यांना बरोबरीचे श्रेय जाते. डॉ. दीक्षित नेहेमीच सांगत आले आहेत. नागपूर मेट्रोच्या मेट्रो भवन येथे, सीपीएम कार्यालयात तसेच विविध स्थानकावर पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच औपचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मेट्रो स्टेशनवर महिला कार्यरत असल्याने विशेषतः तरुणी आणि महिला प्रवाश्यांना एक चांगले वातावरण मिळत आहे. महिलांच्या उपस्थितीमुळे विना तक्रार आणि अडचणींशिवाय महिला सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर यात्री सुविधा सहाय्यक पदासाठी असणाऱ्या बहुतांश महिला कार्यरत आहेत. स्थानकावर सुरक्षा रक्षक पदासाठी देखील महिलांचा समावेश आहे, तसेच कार्यालयातील अनेक पदावर महिला सहकारी उत्तम पद्धतीने कार्य करीत आहेत. प्रवाश्यांचे मार्गदर्शन करताना स्त्रिया उल्लेखनीय भूमिका पार पाडत आहेत. मेट्रो ट्रेन पायलटच्या रूपात जेव्हा प्रवासी महिला पायलटला पाहतात तेव्हा आदरपूर्वक वातावरण निर्माण होते. शिस्तबद्ध कार्य करून घेण्यासाठी महिलांची भूमिका निर्विवाद मानली जाते.

सीपीएम कार्यालयात आणि मेट्रो भवन येथे कार्यक्रमच्या दरम्यान मेट्रो महिला कर्मचाऱ्यांनी आपापले अनुभव ऐकवले, याशिवाय गाणी, कवितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. स्थानकावरील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले. यावेळी महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजीक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक(ऑपरेशन अँड मेंटेनन्स) श्री. उदय बोरवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleएलआयसीच्या आयपीओला सेबी ची मंजुरी:सरकार विकणार 31 कोटींचे इक्विटी शेअर, पॉलिसी होल्डर्ससाठी 10% शेअर
Next article#Nagpur | महिलादिनी फॅशन शो व महा हँडलूम अँप विमोचित
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).