Home हिंदी #Nagpur | महिलादिनी फॅशन शो व महा हँडलूम अँप विमोचित

#Nagpur | महिलादिनी फॅशन शो व महा हँडलूम अँप विमोचित

नागपूर ब्यूरो: महाराष्ट्र राज्य हाथमाग महामंडळ राज्यात वस्त्रोद्योग व्यवसायास राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून सदरचा व्यवसाय संपूर्ण राज्यात पसरलेला आहे त्यामुळे विणकरांच्या रोजगारीचा प्रश्न सोडविण्यास मदत होत आहे. महाराष्ट्रातील परंपरागत हातमाग व्यवसाय टिकवून रहावा व कुशल विणकरांद्वारे उत्पादीत उच्च प्रतीच्या कापडाची ओळख कायम असायी तथा विणकरांना रोजगार उपलब्ध होत रहावे ह्या सामाजिक दृष्टीकोन लक्षात ठेवून हातमाग महामंडळ कार्यरत आहे. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हातमाग महामंडळाद्वारे उत्पादीत मालाची विक्री ऑनलाईन मार्फत होत असताना सोबतच अँपद्वारे विक्री सुरु करण्याचे दृष्टीने अँपचे विमोचन करण्यात आले.

ग्राहकांना आता अॅप द्वारे सुध्दा हातमाग वस्त्रांची खरेदी करता येईल. जागतिक महिला दिनानिमित्त फॅशनशोचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ८ मार्च ते १० मार्च या कालावधीत ऑनलाईन तथा अॅप द्वारे खरेदी करताना अतिरिक्त ५% सूट देण्यात येत आहे. महामंडळाद्वारे पैठणी व इतर करवती साड्यांचे उत्पादन ग्राहकाच्या आवडीनुसार सुद्धा घेण्यात येत आहे. (Customize) कॉटन व बांबू, बनानासह पैठणीचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. हातमाग महामंडळाकडे उत्पादीत मालापासून तयार ड्रेसेस परिधान करून मॉडेलने भारताचे वतीने मिस वर्ल्ड दूरीस्ट २०१८ तथा मिसेस युनिव्हर्स- २०१७ प्रतियोगीतेत भाग घेऊन उत्पादनाची प्रचार प्रसिध्दी विदेशात करण्यात आली व मिसेस युनिव्हर्स २०१७ प्रतियोगीतेमध्ये मिसेस लव्हली हे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भारताकडून सहभागी मॉडेल्सला मिळालेले आहे.

“मागेल त्याला काम” देण्याचे धोरण हातमाग महामंडळाद्वारे राबविण्यात येत आहे त्यानुसार विणकरांनी विणकाम करण्याची मागणी महामंडळाकडे केल्यास महामंडळ अश्या विणकरांना गुत्ता पध्दती अंतर्गत काम देण्यात सदैव तयार आहे. जास्तीत जास्त विणकरांना रोजगार उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे धोरण आहे. असे महाहँडलूम्सच्या व्यवस्थापकीय संचालिका शीतल-तेली-उगले यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाहँडलूम्सचे उपव्यवस्थापकिय संचालक विजय निमजे, विदर्भातील विणकर, कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

वीणा सारडा, डॉ.अनुपमा भुते, कृपा सावलानी, शीतल चावा, मीनू साबू, आरती कलोडे, प्रिया उपगनलवार, कांचन पटेल, अमृता अग्रवाल, मेघना कुंभारे, मीनू भंडारी, निधी गांधी, तालिया मिर्झा यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य हाथमाग महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालिका शीतल तेली – उगले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनिष करंदीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार निधी गांधी यांनी मानले.

Previous article#Maha_Metro | मेट्रो भवनात झाला महिला दिन साजरा
Next articleमेटा महिलाओं के लिए इंटरनेट को सुरक्षित एवं समावेशी बनाने पर दे रहा है विशेष ध्‍यान
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).