Home Stock Market एलआयसीच्या आयपीओला सेबी ची मंजुरी:सरकार विकणार 31 कोटींचे इक्विटी शेअर, पॉलिसी होल्डर्ससाठी...

एलआयसीच्या आयपीओला सेबी ची मंजुरी:सरकार विकणार 31 कोटींचे इक्विटी शेअर, पॉलिसी होल्डर्ससाठी 10% शेअर

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) बाबत एक मोठी बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार LIC च्या IPO ला मार्केट रेग्युलेटर SEBI ने मान्यता दिली आहे. मार्केट रेगुलेटरकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुद्यानुसार, सरकार LIC च्या IPO अंतर्गत 31 कोटी पेक्षा जास्त इक्विटी शेअर्स विकणार आहे.

LIC चा इश्यू हा भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. लिस्ट केल्यानंतर, LIC चे मार्केट व्हॅल्यूएशन RIL आणि TCS सारख्या शीर्ष कंपन्यांच्या बरोबरीचे असेल. याआधी पेटीएमचा इश्यू सर्वात मोठा होता आणि कंपनीने गेल्या वर्षी आयपीओमधून 18,300 कोटी रुपये उभे केले होते.

अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या IPO मध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा समावेश करण्यासाठी FDI धोरणात बदल केला आहे. या बदलानुसार, LIC च्या IPO मध्ये ऑटोमॅटिक रुटने 20% पर्यंत विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे.

DRHP नुसार, आरक्षणाच्या भागांतर्गत LIC पॉलिसी धारकांसाठी 10% शेयर रिझर्व्ह राहील. कदाचित त्यांना शेअरच्या किमतीत 5% सूट मिळू शकेल.

देशातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीने 13 फेब्रुवारी 2022 रोजी मार्केट रेगुलेटर सेबीकडे IPO चा मसुदा (DRHP) सादर केला होता. यानुसार, कंपनी सुमारे 31.6 कोटी किंवा 5% शेअर्स विकणार आहे. DRHP नुसार, IPO मध्ये LIC पॉलिसी धारकांसाठी 10% शेअर्स राखीव असतील. कदाचित त्यांना शेअरच्या किमतीत 5% सूट देखील मिळू शकेल. रिझर्व्हेशनचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकांचे पॅन अपडेट केले पाहिजेत.

Previous articleफडणवीसांचा गौप्यस्फोट । गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा कट, मला संपविण्याचा प्रयत्न
Next article#Maha_Metro | मेट्रो भवनात झाला महिला दिन साजरा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).