Home Nagpur Nagpur । हवालाचे 4.20 कोटी जप्त, कोतवालीतील सदनिकेत पोलिसांचा छापा

Nagpur । हवालाचे 4.20 कोटी जप्त, कोतवालीतील सदनिकेत पोलिसांचा छापा

नागपूर ब्युरो : नागपूर शहर पोलिसांच्या परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घातला. पोलिसांनी येथे तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4 कोटी 20 लाखांची रोकड जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

रोकड नागपुरात येण्याची मिळाली होती माहिती

गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधींची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची माहिती उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचित करून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंभारपुऱ्यात इंद्रायणी साडीच्या मागे एक अपार्टमेंट आहे. तेथे शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा घातला. तेथे नेहाल सुरेश वडालिया (वय 38, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (वय 45) आणि शिवकुमार हरीशचंद दिवानीवाल (वय 52, दोघेही रा. गोंदिया) हे तिघे नोटा मोजताना आढळले. पोलिसांचा छापा पडताच हे तिघे घाबरले. त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. ते हवाला व्यावसायिक असल्यामुळे ही रोकडही हवालाची असल्याचा अंदाज बांधून 4 कोटी 20 लाखांची रोकड तसेच या तिघांना ताब्यात घेतले.

ज्या ठिकाणी ही कारवाई झाली ती सदनिका नेहाल वडालिया याची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत सहायक पोलीस आयुक्त सुर्वे, पोलीस निरीक्षक ठाकरे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, दीपक वानखेडे आणि त्यांचे सहकारी मध्यरात्रीपर्यंत या कारवाईत गुंतले होते.

मशिनच्या साह्याने नोटा मोजूल्या

पाचशे, दोन हजार आणि इतर मूल्यांच्या नोटांचे बंडल एवढे जास्त होते की मशिनच्या साह्याने नोटा मोजूनही पोलिसांची दमछाक झाली. हवालाच्या या सव्वाचार कोटींपैकी बरीचशी रक्कम पच्चीकार आणि दिवानीवाल यांनी गोंदियाहून आणली. ते आज दुपारीच नागपुरात आले. त्यांनी येथील काही व्यापाऱ्यांकडूनही रोकड गोळा केली.

Previous articleनवीन अपडेट । आता व्हॉट्सअ‍ॅपवर इंटरनेट नसतानाही करता येणार मॅसजेची देवाण-घेवाण
Next article‘ऑपरेशन गंगा’ के पहले विदेशी जमीन पर ये बड़े रेस्क्यू मिशन चला चुका है भारत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).