Home Nagpur #Maha_Metro | गड्डीगोदाम मेट्रो स्थानकाचे काम प्रगती पथावर, 90 टक्क्यांहून अधिक स्टेशनचे काम...

#Maha_Metro | गड्डीगोदाम मेट्रो स्थानकाचे काम प्रगती पथावर, 90 टक्क्यांहून अधिक स्टेशनचे काम संपले

नागपूर ब्यूरो : शहरातील सर्वात प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या गड्डीगोदाम मेट्रो स्टेशनचे काम वेगाने सुरू असून 90 टक्क्यांहून अधिक स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. उल्लेखनीय आहे कि, गेल्या महिन्यात डबल लाइन रेल्वे ट्रॅकवर ८०० टन वजनदार हेवी पार्ट गर्डरचे प्रक्षेपण करण्यात आले होते. हे स्थानक महा मेट्रो नागपूरच्या रीच -२ च्या मार्गिकेवर आहे जे सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर स्टेशनपर्यंत पसरलेले आहे.

स्थानकाची सर्वात अभिनव बाब म्हणजे मेट्रो व्हाय-डक्ट (ट्रॅक) पुलाच्या चौथ्या स्तरावर आहे. या स्थानकात तळमजला ते तिसऱ्या मजल्यापर्यंत चार मजले आणि इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्टेशन इमारतीचा समावेश आहे. या स्थानकाला चारही बाजूंनी व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, दुकाने आणि गुरुद्वाराने वेढलेले आहे. स्टेशन अतिशय पर्यावरणपूरक आणि प्रवासीस्नेही आहे.

Previous article#Nagpur | समाजसेवी आदिल विद्रोही की याद में ऑल इंडिया मुशायरा कल
Next articleभारतीयों को लेकर दिल्ली पहुंचे एयरफोर्स के तीन ग्लोबमास्टर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).