Home Maharashtra युक्रेन मध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्हयातील नागरिक व नातेवाईकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क...

युक्रेन मध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्हयातील नागरिक व नातेवाईकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी

561

गोंदिया ब्युरो : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशात तनावपूर्ण परिस्थितीत निर्माण झाली असून रशिया या देशाने युध्द घोषित केलेले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये गोंदिया जिल्यहातील नागरिक अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे संपर्क करुन अडकलेल्या नागरिकांची माहिती कळवावी. जेणेकरुन, रशिया व युक्रेन या देशात अडकलेल्या नागरिकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबतची कार्यवाही करणे सोईचे होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतीसाठी राष्ट्रीय व जिल्हा स्तरावरावरील मदत कक्षाचे हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. भारतीय नागरिकांसाठी खालील प्रमाणे नवी दिल्ली येथे हेल्पलाईन स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष (गृह विभाग),  नवी दिल्ली
फोन — टोल फ्री 1800118797
फोन 011 – 23012113, 23014105, 23017905
फॅक्स नंबर 011 – 23088124
ईमेल — situationroom@mea.gov.in

गोंदिया जिल्हयातील नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
१) जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया |
फोन क्र. – 07182 – 230196
भ्रमणध्वनी क्र. – 9404991599.
ईमेल — rdcgon@gmail.com
२) जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक  कार्यालय, गोंदिया
फोन क्र. – 07182 – 236100
भ्रमणध्वनी क्र. – 9130030548, 9130030549
ईमेल — dharbale29api@gmail.com

वरिल प्रमाणे माहिती कळविण्यासाठी नोडल अधिकारी,  राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया भ्रमणध्वनी क्र. 9881064449 व  रंगनाथ धारवळे, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया भ्रमणध्वनी क्र. 8888842120 यांचेशी संपर्क साधावे, असे आवाहन श्रीमती नयना गुंडे, जिल्हाधिकारी, गोंदिया यांनी याद्वारे गोंदिया जिल्हयातील सर्व नागरिकांना केले आहे.

Previous articleयुक्रेनमध्ये अडकलेल्या सहा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचा प्रशासनाशी संपर्क, सर्व जण सुखरुप असल्याची माहिती
Next articleयूएन में रूस के खिलाफ निंदा प्रस्ताव | इंडिया ने वोट नहीं डाला, यूक्रेन पर फादर ऑफ ऑल बॉम्ब का खतरा
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).