Home Education बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

516

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.

बारावीची परीक्षा 4 मार्च रोजी सुरू होणार असून 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी तर 7 मार्चला होणारा पेपर 7 एप्रिल रोजी होणार आहे. पुणे-नगर मार्गावर पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. जळून खाक झालेल्या प्रश्नपत्रिका याच विषयाच्या असल्याने बारावीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्याची नामुष्की मंडळावर ओढवली आहे.

5 मार्चला सकाळी 10:30 ते 2 यावेळेत हिंदी तर दुपारच्या 3 ते 6 वेळेत जर्मन जपानी, चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर 7 मार्चला सकाळच्या 10:30 ते 2 या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलगु, पंजाबी, बंगाली आणि दुपारच्या 3 ते 6 या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता़ आता 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी तर 7 मार्चला होणारा पेपर 7 एप्रिल रोजी नियोजित सत्रातील वेळेत होणार आहे.

Previous articleआज रिलीज | सुप्रीम कोर्ट ने गंगूबाई काठियावाड़ी के दत्तक पुत्र की याचिका खारिज की
Next articleअमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटली, बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).