Home मराठी अमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटली, बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी

अमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटली, बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी

524

अमरावती : ब्युरो : अमरावतीत खाजगी बस नाल्यात पलटली. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्ये प्रदेशकडे ही बस जात होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसमध्ये 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील अर्जुननगर परिसरातील घटना ही घटना घडली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या वाक्याला तंतोतंत शोभेल अशी घटना अमरावतीमध्ये घडली. अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमधील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली.


सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. कुठलीच जीवितहानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने होती. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. दरम्यान, एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे.

आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात होती. सध्या एसटी बस बंद आहेत. त्यामुळं ही खासगी बस खचाखच प्रवाशांनी भरून होती. अशातच अमरावती शहरात अर्जुन नगर परिसरात ही बस येताच रोडच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पलटी झाली. लहान चिमुकले बचावले. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, असावा असा अंदाज आहे.

Previous articleबारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला
Next articleऑरेंज सिटी मॉल | नागपूरकरांचे नाव जागतिक स्तरावर नेणारा अभिनव प्रकल्प : ना. नितीन गडकरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).