Home मराठी Maharashtra । राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

Maharashtra । राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी

621

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. आज सकाळी 7.30 वाजेदरम्यान मलिक ईडी कार्यालयात हजर झाल्याची माहिती मिळत आहे. ईडीने समन्स बजावल्यामुळे मलिक चौकशीसाठी हजर झाले आहेत. त्यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, जमीन खरेदी प्रकरणात ईडीने मलिक यांना समन्स बजावले असून, त्या चौकशीसाठी त्यांना आज बोलण्यात आले आहे. आज सकाळी 6.30 वाजता ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी आले होते. त्यानंतर मलिक 7.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दाऊद इब्राहीम मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांची चौकशी करण्यात असून, दाऊदचा भाऊ इकबाल कासकरच्या चौकशीनंतर मलिक ईडीच्या रडार आहेत. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी हे नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावले. मनी लाँन्ड्रिग प्रकरणी चौकशी आणि जबाब नोंदवणार आहेत. मलिकांचे अंडर्वर्ल्डशी संबंध आहे का? याची चौकशी होणार आहे. दाऊदवर एनआयएने गुन्हा नोंदवल्यानंतर ईडी चौकशीला वेग आला आहे. दाऊदच्या साथादारांच्या घरांवर ईडीचे छापे मारण्यात आले होते. दरम्यान, दाऊदच्या भावाचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.

9 नोव्हेंबर 2021 रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा खळबळजनक खुलासा केला होता. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले होते. ही जमीन मुंबईतील अंडरवर्ल्डच्या मालकीच्या आहेत. सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांचे निकटवर्तीय सलीम पटेल यांचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक यांना विकली होती. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील 3 एकर जमीन केवळ 20-30 लाखांना विकली गेली, तर त्याची बाजारभाव 3.50 कोटींहून अधिक होती. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पुरावे आपण केंद्रीय यंत्रणांना दिल्याचेही भाष्य केले होते. याच प्रकरणात कारवाई करताना ईडीच्या पथकाने नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते.

Previous articleचंडीगढ़ | गुरुवार तक नहीं आएगी बिजली,अस्पतालों में सर्जरी टलीं, घरों में पानी नहीं, आर्मी बुलानी पड़ी
Next articleचौकशीनंकर मलिकांना आठ दिवस ईडीची कोठडी; राजीनामा घेणार नाही- महाविकास आघाडी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).