Home Nagpur Nagpur । नागपूर मनपा निवडणूक, प्रभाग रचनेवरील आक्षेप, हरकतींवर आज होणार सुनावणी

Nagpur । नागपूर मनपा निवडणूक, प्रभाग रचनेवरील आक्षेप, हरकतींवर आज होणार सुनावणी

570

नागपूर ब्युरो : महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय. यापूर्वी चार सदस्यीय प्रभाग होता. यंदा तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे जुन्या प्रभागांत थोडाफार बदल करण्यात आला आहे. एका प्रभागातील भाग दुसऱ्या प्रभागात गेला आहे. या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील हरकतींवर 21 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात ही सुनावणी होईल. एक फेब्रुवारी रोजी नव्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. या नव्या रचनेवर चौदा फेब्रुवारीपर्यंत एकूण 132 हरकती व सूचना प्राप्त झाल्या. या हरकती व सूचनांबाबत आज सुनावणी होणार आहे. दुपारी बारा वाजतापासून ही सुनावणी घेण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. पूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत ही सुनावणी चालणार आहे.

नव्या प्रभाग रचनेत काही प्रभागांची बदली झाली. एका प्रभागातील भाग दुसऱ्या प्रभागात गेला. यावर काही नगरसेवकांनी आक्षेप मांडला. हा आक्षेप किती योग्य आहे. त्यावर आज सुनावणी होईल. त्यानंतर त्यात काही किरकोळ बदल केले जाऊ शकतात. प्रभाग रचनेतून काही वस्त्यांची नावे गहाळ झालीत. यामुळं नागरिकांमध्ये आपण नेमके कुठल्या प्रभागात मोडतो, यावरून संभ्रम पसरला आहे.

प्राप्त झालेल्या 132 हरकती व सूचनाधारकांना नागपूर मनपाकडून सुनावणीस उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी नोटीसनुसार दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आक्षेपकर्त्यांना नोटीस मिळण्यात काही अडचण निर्माण झाली असल्यास त्यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाशी संपर्क करावे, असेही कळविण्यात आले आहे. ही सुनावणी घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे बी . वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान सचिव, (वने) मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते या सुनावणीस उपस्थित राहणार आहेत.

Previous articleतेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next article#Maha_Metro | मुख्य मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त आणि पथकाचे ३ दिवसीय रिच-४ चे निरीक्षण संपन्न
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).