Home कोरोना Omicron । देशात 7 दिवसांत रुग्ण 45% घटले, तर मृत्यू 52% वाढले

Omicron । देशात 7 दिवसांत रुग्ण 45% घटले, तर मृत्यू 52% वाढले

530

देशात कोरोनाचे नवे रुग्ण घटण्याचा वेग कायम आहे. गेल्या ७ दिवसांत नवे रुग्ण ४५%, मात्र रोजचे मृत्यू ५२% वाढले आहेत. असा ट्रेंड जगातील इतर कोणत्याही देशात दिसलेला नाही. मग भारतातच असे का होत आहे? महामारी तज्ज्ञ यामागे ३ प्रमुख कारणे देत आहेत.

पहिले- बाधित झाल्यानंतर कोणत्याही रुग्णाचा मृत्यू ३ ते १५ दिवसांच्या आत होतो. म्हणजे, जी व्यक्ती एक-दोन आठवड्यांपूर्वी बाधित झाली असेल आता तिचा मृत्यू होत आहे. यामुळे जसजसे नवे रुग्ण बरे होत जातील, तसतसे पुढील १०-१२ दिवसांत मृत्यूही घटतील, अशी अशा आहे. दुसरे कारण- काही राज्ये मागील मृत्यू अपडेट करत आहेत. देशात बुधवारी १२४१ मृत्यू नोंद झाले, पैकी ८५४ केरळात हाेते.

त्यातील ५८७ पूर्वीचे असल्याचे केरळ सरकारने सांगितले. तिसरे कारण- मृत्यूची भरपाई. यामुळे बहुतांश राज्ये आता मृत्यू लपवत नाहीयेत. तथापि, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान बहुतांश राज्यांनी खरी आकडेवारी दडवली होती.