Home Crime हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा; न्याय मिळाला पण अर्धवटच

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा; न्याय मिळाला पण अर्धवटच

591

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळेला दोषी ठरवले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फुलराणी जळीतकांड प्रकरणाला आज दोन वर्षांचा कालावधी लोटला आहेत. प्राध्यापिका फुलरणीच्या मारेकऱ्याला दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हिंगणघाट न्यायालयात तिच्या मृत्यूच्या दोन वर्षानंतर आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

फुलराणी प्राध्यापिका तरुणी जळीतकांड प्रकरणाचा तपास पूर्ण करीत 426 पानांचे दोषारोप पत्र दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन माजगावकर यांच्या न्यायालयात तत्कालीन पोलिस निरीक्षक सत्यविर बंडीवार यांनी सादर केले होते.

फुलराणी जळीतकांड प्रकरण खटल्याच्या युक्तिवादाला 11 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली असता, मृत फुलराणीच्या वडिलांनी दिनांक 12 जानेवारी रोजी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी साक्ष नोंदविली होती. वडिलांची साक्ष नोंदविल्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपीला पत्नी व चिमुकली मुलगी बघताच पश्चाताप झाला होता. पोलिसांची साक्ष नोंदविली असता आरोपीने फुलराणीवर पेट्रोल टाकून घटनास्थळावरुन पळ काढत ते अंगावर असलेले कपडे शेतात लपविले असल्याचे साक्ष नोंदविताना सांगण्यात आले. आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे हा घटनेच्या दिवशी कामावरुन गैरहजर असल्याची साक्ष दिनांक 6 एप्रिल2021 रोजी रेल्वे विभागातील कंत्राटदार दिपकसिंग ठाकूर यांनी दिली होती.

Previous articleOmicron । देशात 7 दिवसांत रुग्ण 45% घटले, तर मृत्यू 52% वाढले
Next articleदेशातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर, जगभरात पाचव्या क्रमांकावर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).