Home मराठी लता मंगेशकर । दीदींचा स्वर म्हणजे भारावलेलं राष्ट्रीयत्व : सुनील केदार

लता मंगेशकर । दीदींचा स्वर म्हणजे भारावलेलं राष्ट्रीयत्व : सुनील केदार

482

नागपूर ब्युरो : राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले संपूर्ण भारतीय जनतेच्या हृदयातला स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज. लतादीदींचा स्वर म्हणजे भारावलेले राष्ट्रीयत्व. संपूर्ण देशाला एका सुराने एकवटण्याचा दैवी आवाज ईश्वराने त्यांना दिला होता. भारताची जागतिक पातळीवरची ओळख लतादीदी होत्या.

आमच्या अनेक पिढ्या त्यांच्या सुमधुर गीतांनी मंतरलेल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस घरातील प्रत्येकाला शोकाकूल करणारा आहे. नागपुरात लतादीदी जेव्हा जेव्हा आल्यात, त्यावेळी त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. आमचं बालपण, आमचं तारुण्य,आमचं कार्यकर्तृत्व फुलवण्याचं काम या एका अजरामर आवाजाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील त्यांच्या ‘ए मेरे वतन के लोगो ‘, हे गाणं ऐकताना भावनिक झाले होते. त्यांचा सूर असा ह्दयाला हृदयाशी जोडणारा होता.

आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत आणि मानवी समाजामध्ये ऐकण्याची कला जीवंत असेपर्यंत लतादीदींना कोणीही विसरणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज त्यांचे जाणे,संपूर्ण भारतीय समाजाला जागतिक स्वर -सुरांच्या विश्वासाला धक्का देणारे आहे. दीदींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सुरेल व अजरामर गीतांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या देशभक्तीला शतशः प्रणाम करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.

Previous articleलता मंगेशकर । दीदी म्हणजे गायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान : विजय वडेट्टीवार
Next articleलता मंगेशकर । दिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).