Home मराठी नागपुर जिल्ह्यात 1 ते 12 आणि औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील 1 ते...

नागपुर जिल्ह्यात 1 ते 12 आणि औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील 1 ते 7 चे वर्ग सुरू करण्यास परवानगी

454

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने राज्याने पुन्हा शाळा उघडण्यास परवागणी दिली आहे. नागपुर जिल्ह्यात 1 ते 12 चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा मंगळवार दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहेत. सर्व शाळांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या तीन-चार वेळेपासून आठ-दहा दिवस शाळा सुरू आणि बंद असा प्रकार सुरू आहे. आधीच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले, आणि कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याने शाळा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तर डिसेंबर महिन्यात शाळाही न पाहिलेले पहिली ते सातवीच्या वर्गात विद्यार्थी आले होते. परंतु अवघे पंधराच दिवस शाळेत आल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुन्हा शाळा बंद ठेवण्यात आल्या. 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहितील असा निर्णय नागपूर आणि औरंगाबाद जिल्हा आणि मनपा प्रशासकांनी घेतला होता.

त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात आठवी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग 25 जानेवारीपासून सुरू करण्यात आले. तर शहरातील दहावी आणि बारावीचे वर्ग सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग उद्या मंगळवार पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे गटणे यांनी सांगितले. तर शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यात आणि शहरात मंगळवार दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून वर्ग 1 ते 12 सुरू होणार आहेत.

Previous articleविद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका; रस्त्यावर उतरवणाऱ्यावर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी
Next articleबजट 2022 | इनकम टैक्स में फायदा, नौकरीपेशा और किसानों को मिल सकता है राहत का बूस्टर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).