Home मराठी भाजयुमोने विद्यापीठ काळे विधेयक मागे घेण्याकरीता मध्यरात्री काढली पालकमंत्र्यांच्या घरासमोर रांगोळी

भाजयुमोने विद्यापीठ काळे विधेयक मागे घेण्याकरीता मध्यरात्री काढली पालकमंत्र्यांच्या घरासमोर रांगोळी

300
0

नागपूर ब्युरो : महाविकास आघाडीने जे अनैतिकतेने विद्यापीठ कायदा काळे विधेयक जे साभागृहात पारित केले त्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा सातत्याने वेग-वेगळ्या पद्धतीने त्याचा विरोध दर्शवत आहे. या आधी संघटनेने लाखोंच्या घरात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवले, हे काळे विधेयक मागे घ्या या विषयावर मोठ्या प्रमाणात मिस्ड कॅाल्स मुख्यमंत्र्यांना आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना दिलेत आणि संपुर्ण महाराष्ट्रातुन फोन करून विनंती केली की विद्यापीठ विधेयक त्वरित मागे घ्यावे.

आज संपुर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटीलांच्या मार्गदर्शनात ही स्थानिक पालकमंत्री आहेत किंवा महाविकास आघाडीचे प्रमुख आमदार-खासदार आहेत त्यांच्या घरासमोर रांगोळी कढुन मागणी करतो आहोत की हे विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे.

नागपुरात पालकमंत्री नितीन राऊत ह्यांच्या निवासस्थानी युवतींच्या समवेत भारतीय जनता युवा मोर्च्याच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे ह्यांच्या नेतृत्वात, भाजप महामंत्री बाल्या बोरकर आणि युवा मोर्चा शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले च्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. ह्यात प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग कदम, भक्ती आमटे, राखी मानवटकर, सपना तावडे, दीपांशु लिंगायत, सचिन करारे, सनी राऊत, सचिन सावरकर, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, गोविंदा, देव यादव, अनिकेत ढोले, संदीपन शुक्ला, रोहित तसेच प्रसाद मुजुमदार आणि मॉन्टी पिल्लारे आदी उपस्थित होते.

विद्यापीठात राजकारण आणु नये, ज्या प्रकारचे तुमचे मनसुबे आहेत की शिक्षणात राजकारण करून स्वताःचे हित साधण्याचे ते भारतीय जनता युवा मोर्चा कदापी होऊ देणार नाही. आज केवळ पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर रांगोळी काढुन आज विरोध दर्शविला आहे. विधेयक वापस घेण्याकरीता महाविकास आघाडीने त्वरित कारवाही केली नाही तर भविष्यात अधिक उग्र रूप घेईल व जनमाणसाच्या दबावाला झुकावे लागेल आणि हे काळे विधेयक मागे घ्यावे लागेल, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

Previous articleकरीना कपूर खान बनीं पुणे पुलिस की क्रिएटिविटी की फैन, सोशल मीडिया पर शेयर किया वीडियो
Next articleखादी बाजार प्रदर्शनी एवं बिक्री में आयुर्वेद नाड़ी व प्रकृति परीक्षण शिविर आज से
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here