Home हिंदी लोन देत नाही म्हणून कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यात बँकच पेटवली ; 12 लाखांचे...

लोन देत नाही म्हणून कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यात बँकच पेटवली ; 12 लाखांचे नुकसान

550

बँकेने कर्जाची फाईल मंजुर न केल्याने एका पठ्ठ्याने चक्क बँकेला आग लावली आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यात ही घटना घडली असून, बँकेने कर्जाची फाईल रिजेक्ट केल्यानंतर रागाच्या भरात एका युवकाने बँकेला आग लावली आहे. वसीम हजरतसाब मुल्ला असे बँकेला आग लावणाऱ्या आरोपीचे नाव असून, तो रतिहल्ली येथील रहिवासी असल्याचे कळते.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वसीमने कॅनरा बँकेत कर्जासाठी फाईल टाकली होती. मात्र त्याचे CIBIL स्कोर कमी असल्याच्या कारणावरुन याची फाईल कर्जासाठी अपात्र ठरली. त्याचे राग मनात धरत वसीम हा शनिवारी बँकेत पोहोचला त्यानंतर त्याने बँकेची एक खिडकी उघडल्यानंतर बँकेच्या आत पेट्रोल ओतले आणि काडी लावली. काही वेळानंतर बँकेच्या समोरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांनी पाहिले असता, बँकेतून धूर निघत असल्याने त्यांनी तात्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Previous articleदेशात गेल्या 24 तासात 1.68 लाख जणांना कोरोनाची लागण, तर 277 जणांचा मृत्यू; सक्रिय रुग्ण 8 लाख
Next articleअभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरला कोरोनाची लागण
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).