Home कोरोना संसर्गवाढीचा धोका, सोमवारी देशात 1 लाख 65,873 नवे रुग्ण आढळले

संसर्गवाढीचा धोका, सोमवारी देशात 1 लाख 65,873 नवे रुग्ण आढळले

501
देशात कोराेना रुग्णवाढीचा वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. सोमवारी १,६५,८७३ नवे रुग्ण आढळले. अनेक राज्यांत १ वा २ दिवसांतच रुग्ण दुप्पट वाढत आहेत. त्या तुलनेत चाचण्या मात्र कमीच होत आहेत. गेल्या २ आठवड्यांचा ट्रेंड पाहता या काळात देशात रुग्ण २८ पट वाढले, मात्र चाचण्या दुप्पटही नाहीत. २७ डिसेंबरला देशात ६,२७० रुग्ण आढळले, तर ११.४१ लाख चाचण्या झाल्या.

दैनंदिन संसर्गदर ०.५% होता. ९ जानेवारीला देशात १,७९,७२३ रुग्ण, तर १५.१४ लाख चाचण्या झाल्या. संसर्गदरही वाढून १३.२% झाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, सध्या ५ ते १०% रुग्णांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत आहे. दुसऱ्या लाटेत २०-२३% रुग्णांना दाखल करावे लागत होते, असा दावा केंद्राने केला आहे.

निर्बंधांत पुन्हा वाढ : गंगा आरतीत लोकांना मनाई

  • काशीत गंगा आरती प्रतीकात्मक. लोकांना सहभागी होता येणार नाही.
  • दिल्लीत रेस्तराँ व बारमध्ये फक्त ‘टेक अवे’ची सुविधा मिळेल.
  • आंध्र प्रदेशात नाइट कर्फ्यू लागू.
  • तामिळनाडूत विद्यापीठांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या.
  • महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू.