Home मराठी #Maharashtra | समृद्धी महामार्गाचे 77 टक्के काम पूर्ण, सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे...

#Maharashtra | समृद्धी महामार्गाचे 77 टक्के काम पूर्ण, सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

585

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाच्या सद्य:स्थितीचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आढावा घेतला. महामार्गाचे उर्वरित काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले. डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्पाचे ७६.७२ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

नागपूर ते मुंबई या महामार्गादरम्यान वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने ७०१ किमी लांबीचा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगतीचा बनसोडे यांनी आढावा घेतला. या वेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, मुख्य अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता जगताप व संबंधित अधिकारी हे उपस्थित होते. या वेळी विभागाच्या सादरीकरणात सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी ८,८६,९०२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रकल्पास आवश्यक असलेला गौण खनिजांच्या उत्खननावर आकारणीपत्र असलेल्या स्वामित्वधन बसविण्यास सूट दिली आहे. बांधकाम पॅकेज १ ते १३ चे काम ३० महिन्याच्या कालावधीत व बांधकाम पॅकेज १४ ते १६ चे काम ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजित आहे, यानुसार सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण करणे नियोजित आहे.